Home Breaking News    Chandrapur city@ news गिता जयंती व देव दिपावली कार्यक्रमांचे आयोजन-महिलांची...

   Chandrapur city@ news गिता जयंती व देव दिपावली कार्यक्रमांचे आयोजन-महिलांची उपस्थिती लक्षणीय!

155

Chandrapur city@ news

■ गिता जयंती व देव दिपावली कार्यक्रमांचे आयोजन-महिलांची उपस्थिती लक्षणीय!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर : कुणबी महिला मचं चद्रंपूर यांच्या वतीने लक्ष्मीनगर कुणबी सभागृहात गिता जयंती व देवदिपावली कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.

आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ध.कुणबी महिला मचंच्या अध्यक्षा सविता सातपुते- कोट्टी यांचे पुढाकाराने महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यात विशेष योगदान असून त्यांच्यातील अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देणे हाच या विचार मंच मुख्य हेतू आहे. देवदिपावली साजरी करून या वेळी सविता कोट्टी यांनी गिता जयंतीचे महत्त्व विशद केले .आरंभी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

तेजस्विनी बल्की यांनी रंगमंचाची सुंदर व सुरेख सजावट केली होती.रोहीणी गौरकर व पुनम अडवे यांनी स्वागत गित सादर केले तर सोनाली मोहितकर यांनी प्रास्ताविक केले. ममता जुनघरे व प्रियंका बोथले यांनी सुरेखरित्या या कार्यक्रमाचे सचांलन केले.दरम्यान याच कार्यक्रमाचे निमित्ताने संगिता पिपंळशेडे, आशू कष्टी, सुनिता पिपंळशेंडे, प्रिया पिपंळशेडे यांनी महिलांचे विविध खेळ आयोजित केले होते. रंगमंचावर सर्व गृपच्या महिलांनी एक सामुहिक नृत्य सादर केले.या प्रसंगी काही महिलांचे वाढदिवस थाटात व उत्साहात साजरा करण्यांचा एक सोहळा पार पडला.

आयोजित विविध स्पर्धेत अल्का लांडे, माधुरी बल्की ,व गिताजंली गोखरे या स्पर्धक विजेत्या ठरल्या त्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आली. सदरहु कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन सृजनीगृपने केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सर्वांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते . आयोजित कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.महिलांच्या सदैव स्मरणात राहावा असाच एक कार्यक्रम पार पडला.