Home Breaking News Chimur taluka@ news दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नका. ...

Chimur taluka@ news दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नका. त्यांना प्रेम व साथ द्या-तहसीलदार प्राजक्ता बुरांडेंचे पालकांना आवाहन

222

Chimur taluka@ news

■ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नका

■ त्यांना प्रेम व साथ द्या-तहसीलदार प्राजक्ता बुरांडेंचे पालकांना आवाहन

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर: दिव्यांग मुले सामान्य मुलांपेक्षा गुणांनी कमी नसतात, त्यांना प्रेम व साथ द्या.त्यांचा आत्मिश्वास वाढवायला मदत करा.अनेक दिव्यांग व्यक्तींनी गरुडझेप घेतली आहे.सर्वच क्षेत्रात त्यांनी उंच भरारी मारली आहे.या विशेष बालकांत विशेष नैपुण्य असते ते समोर आणण्यांचे काम आपल्याला करायचे असते.ते आपण करीत आहात.माझ्या वतीने तहसीलदार म्हणून मला या मुलांसाठी जेवढं करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न मी करेन असे भावनिक मनोगत चिमूरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय वडाळा चिमूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय दिव्यांग दिन व क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक हजारे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुका अन्नपुरवठा निरीक्षक अधिकारी आशिष फुलके, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय सचिव सुरेश डांगे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीहरी सातपुते, मुख्याध्यापक रामदास कामडी, मंगेश तुळसकर, राजेंद्र बावणे उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय दिव्यांग दिन व क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून व महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आले.

यावेळी मुक बधीर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले होते. क्रीडा क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते सन्माचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमुख अतिथी सुरेश डांगे, श्रीहरी सातपुते यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना महाकाळकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी केले. सदरहु कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.