Home कृषी Chandrapur @taluka news धाडसी असलेल्या भोई समाजाच्या विकासासाठी कटीबध्द :किशोर...

Chandrapur @taluka news धाडसी असलेल्या भोई समाजाच्या विकासासाठी कटीबध्द :किशोर जोरगेवार चंद्रपूरात उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन

149

Chandrapur @taluka news

■ धाडसी असलेल्या भोई समाजाच्या विकासासाठी कटीबध्द :किशोर जोरगेवार

■ चंद्रपूरात उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन

सुवर्ण भारत: किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

बल्लारपुर:भोई हा धाडसी समाज आहे. आजही पाण्यात उतरुन मासेमारी करण्याचा पारंपारिक व्यवसाय समाजाच्या वतीने केल्या जात आहे. आता या व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. चंद्रपूर आणि गडचीरोली क्षेत्रात अनेक मोठे तलाव आहेत. हे तलाव भोई समाजाला मासेमारीसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

व्यवसाया बरोबरच या समाजातील युवक शैक्षणिक क्षेत्रातही समोर गेला पाहिजे ही आपली भुमिका असुन धाडसी असलेल्या या समाजाच्या विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी आज केले.

चंद्रपूर जिल्हा भाई सेवा संघाच्या वतीने चंद्रपूर येथील जतिरामजी बर्वे सभागृहात उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णाजी नागपूरे, निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, खनिकर्म विभाग नागपूरचे सहसंचालक गजाननराव कामडे, विदर्भ विकास मंडळाचे सेवा निवृत्त सहसंचालक प्रकाशराव डायरे, माजी नगर सेवक सुरेश पचारे, संघर्ष वाहिनी प्रमुख दीनानाथ वाघमारे, मनोहरराव पचारे, विदर्भ भोई समाज महिला शाखा अध्यक्ष रंजना पारशिवे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

भोई समाजाच्या वतीने समाजातील युवक युवतींसाठी नियमित उपवर युवक युवती परिचय मेळावे आयोजित केल्या जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्रीत येतो. समाज प्रबोधन होते. त्यामुळे समाजाच्या एकत्रीकरणासासाठी असे मेळावे गरजेचे आहे. वधू-वर परिचय मेळाव्याच्या

माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचे काम समाजाच्या वतीने केल्या जात आहे. समाजातील युवकांमध्ये प्रत्येक समाजाने त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव पाडला पाहिजे असेही आ.जोरगेवार यावेळी म्हणाले.

आज अनेक छोटे समाज विकासाच्या मूख्य प्रहावापासून दुर जात आहे. भोई समाजातील विद्यार्थ्यांमध्ये पूढे जाण्याची जिद्द आहे. शिक्षणाची तळमळ आहे. मात्र, त्यांना यात योग्य मागर्दशनाची गरज आहे. समाजातील पूढा-यांनी याकडे लक्ष देण्याची गरज यावेळी आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली. या सामाजिक कामात लोकप्रतिनिधी म्हणून समाजाला अपेक्षीत अशी मदत करण्याची आपली भुमिका असल्याचे ही ते म्हणाले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशात समाजातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नागपूर येथील मत्स्य विद्यापीठाला जतीरामजी बर्वे यांचे नाव देण्यात यावे ही आपली जुणी मागणी आहे. या अधिवेशात ही मागणी आपण मांडणार असल्याचे समाज बांधवांना त्यांनी सांगीतले. समाजानेही त्यांच्या अडचणी, व्यथा माझ्या पर्यंत पोहचवाव्यात असे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले आहे. कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.