Home Breaking News अखेर “तो “नरभक्षक वाघ जेरबंद!

अखेर “तो “नरभक्षक वाघ जेरबंद!

420

■ अखेर “तो “नरभक्षक वाघ जेरबंद!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी,पान्होडी या गावातील दीड महिन्यात चार जणांचा बळी घेणारा तो वाघ शनिवारला दुपारी वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी जेरबंद झाला.वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून त्या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आले.

सातत्याने या तालुक्यात वाघाचे हल्ले सुरू आहेत.शनिवारी वाघाने शेतावर गेलेल्या पाहर्णी येथील एका महिलेचा बळी घेतला होता. या परिसरात या दीड महिन्यातील वाघाच्या हल्ल्याच्या चार घटना घडल्या. वनिता वासुदेव कुंभरे (पाहर्णी )ही महिला 26-11-2022शनिवारी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता .तिच्यावर हल्ला करून तीला ठार केले होते.

त्यानंतर ढोरपा जवळ असलेल्या टेकरी या शिवारात वाघाच्या हल्यात महिला ठार झाली होती. याच आठवड्यात ढोरपा येथील महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला चढविला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. या मूळे ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या परिसरात वाघाची चांगली दहशत पसरली होती.काल वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करीत त्या नरभक्षक वाघोबाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाला यश मिळाले.

या बाबत पाहाणीॅ येथील माजी सरपंच मोरेश्वर बावनकर, नरेंद्र मसराम,राजेश नान्हे,किशोर निरगुडे,रामराज पंचभाई,व अन्य शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्हाधिका-यांना 1डिसेंबरला निवेदन देण्यात आले होते.त्याच निवेदनाची दखल घेत उपरोक्त कार्यवाही वनविभागाच्या वतीने करण्यात आली असल्याचे बोलल्या जाते.