Home Breaking News Varora@ taluka news वेगळ्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाची घोषणा दिव्यांगासाठी दिवास्वप्न...

Varora@ taluka news वेगळ्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाची घोषणा दिव्यांगासाठी दिवास्वप्न ठरू नये. – सुधाकर कडू जागतिक दिव्यांग दिनानिमित्त साधला संवाद

171

Varora@ taluka news

■ वेगळ्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाची घोषणा दिव्यांगासाठी दिवास्वप्न ठरू नये. – सुधाकर कडू

■ जागतिक दिव्यांग दिनानिमित्त साधला संवाद

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

वरोरा : दरवर्षी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो दिव्यांगांच्या सर्व समावेशक विकासाकडे लक्ष वेधावे यासाठी १९९२ पासून या दिवसाची सुरुवात झाली. २०२२ च्या दिव्यांग दिनाची संकल्पना सर्व समावेशक विकासासाठी परिवर्तनीय उपाय सुलभ आणि न्यायपुर्ण जगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३ डिसेंबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातून नवनिर्मितीची भुमिका घेत “दिव्यांग कल्याण विभाग” मंत्रालयाची अधिकृत घोषणा करून खऱ्या अर्थाने २१ प्रकारातील दिव्यांगांना या दिनाची भेटच दिली म्हणावी लागेल. असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकरजी कडू उद् घाटन प्रसंगी बोलत होते ते पुढे असेही म्हणाले दिव्यांग मंत्रालय हे केवळ मंत्रालयापुरतं मर्यादित न राहता दिव्यांगांच्या शेवटच्या उंबरठ्यावर घरापर्यंत जाऊन त्याला सेवा देण्याचं हे खंर मंत्रालय ठरावं.

निव्वळ घोषणा करून दिवास्वप्न ठरू नये असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात अंधासाठी ब्रेल लिपितुन वाट मोकळी करून देणारे अंध लिपिचे जनक लुईस ब्रेल, डाँ. हेलन केलर व कृष्ठ रोग्यांचे मसिहा श्रध्देय बाबा व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना हारार्पन करून वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साधना माटे, अंध शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा डोंगरवार हे उपस्थित होते. यावेळी अंध शाळेचे कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून घोषवाक्यांची माहिती दिली.

हक्क देऊ , संधी देवू
अपंगांना प्रोत्साहन देवू.
समाजाला जागवू या,
अपंगांना सक्षम बनवू या.
अपंगांचा सन्मान,
हाच आमचा अभिमान.
तर अध्यक्षीय भाषणात डोंगरवार यांनी दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ च्या परिपत्रकाची माहिती देवून त्यांना त्यांचे हक्क, दिव्यांगांसाठी केलेले फायदे, दिव्यांगात्मक प्रतिबंधात्मक उपाय व शासनाच्या विविध योजना याची माहिती देवून हे वर्ष समता पर्व म्हणून शासन साजरे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर सुधाकरजी कडू गुरूजी यांनी लालफित कापून स्पर्धेचे विधिवत उद् घाटन केले. अंध विद्यार्थ्यांनी दौड स्पर्धा, गोळा फेक, लांब उंच उडी, पाँसिंग द बाँल व बुध्दीबळ इत्यादी स्पर्धेत सहभागी होवून दिव्यांग दिन उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाच्या शेवटी आम्हां दिव्यांगाना स्वतंत्र विभागाच्या मंत्रालयाची मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषणा करताच सगळ्या अंध विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करून डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गितांवर ठेका धरून आनंदात थिरकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बांगडकर यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन परमानंद तिराणिक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास कावणपुरे, राकेश आत्राम, रमेश पप्पूलवार, वर्षा उईके, तनुजा सव्वाशेरे, जितेंद्र चूदरी इत्यादी शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.