Home क्राईम Varora taluka@ news उखर्डा ते उखर्डां पाटी रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा...

Varora taluka@ news उखर्डा ते उखर्डां पाटी रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन– अभिजित कुडे

170

Varora taluka @news

● उखर्डा ते उखर्डां पाटी रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन– अभिजित कुडे

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा तालुक्यातील उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे असे निवेदन नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना यांच्या तर्फे देण्यात आले. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे, रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

२ वेळा निवेदन व २ आंदोलनं केल्या नंतर फक्त तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली ते पण पूर्णपणे केली नाही, जनतेच्या मनात आक्रोश आहे जर रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात आले नाही तर वरोरा येथे आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

तहसीलदार वरोरा व सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती इथे निवेदन देण्यात आले. तहसीलदार वरोरा व मुख्य बांधकाम अभियंता यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला .यावेळी नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना सचिव शुभम हीवरकर , तेजस उरकुडे, अनिकेत राऊत उपस्थित होते.