Home Breaking News भिसी नगरीत थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी!

भिसी नगरीत थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी!

183

■ भिसी नगरीत थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

भिसी:थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज भिसी नगरीत साजरी करण्यात आली.या निमित्ताने गुरुवारी शहरातील मुख्य मार्गाने एका रैलीचे आयोजन करण्यात आले होते .यात तैलिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान निघालेल्या एका भव्य पालखी रॅलीत भिसी येथील तेली समाजाचे अध्यक्ष धनराज मुंगले यांचे सह किशोर मुंगले घनश्याम डुकरे ,ममता डुकरे ,निलेश गभणे,राजू भाऊ बनकर, सुनिल ठोंबरे,डोमडूजी ठोंबरे, मैनाबाई ठोंबरे, कवडुजी मुंगले,धिरज मुंगले, पुरुषोत्तम कामडी, उमाकांत कामडी, भास्कर कामडी,प्रेमादास कामडी,अजय पडोळे आदीं सहभागी झाले होते. भिसी येथील नगर पंचायत कार्यालयातही संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .

या कार्यक्रमाला सुभाष हिवरे,जावेद भाई ,रजनी देशमुख,पुजा सांदेकर व अन्य कर्मचारी बांधव उपस्थित होते. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली असल्याचे आमच्या ठिक ठिकाणच्या प्रतिनिधी कळविले आहे.