Ghugus @city news
■ घुग्घुस समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
घुग्घुस दि.८ डिसेंबर २०२२ गुरुवार सकाळ रोजी संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधी चौक घुग्घुस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तेली समाज महासंघ घुग्घुसतर्फे श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष अमोल यावलीकर साहेब, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर उपस्थित होते. तसेच दिव्यांग नागरिकांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आले.सर्व राजकीय पक्ष रक्तदान शिबीर आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.
रक्तदान हिच श्रेष्ठदान देशसेवा आहे, दरवर्षीप्रमाणेच यावर्षी
पण समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था यांचा माध्यमातुन संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्साहात रक्तदान शिबीर आयोजित व उत्साहात साजरा करण्यात येते.यावेळी तेली समाज, सर्व राजकीय पक्ष नेते, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
