Home Breaking News Ghugus city @news धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसच्या वतीने नगरपरिषद येथे...

Ghugus city @news धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसच्या वतीने नगरपरिषद येथे श्री.संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

258

Ghugus city @news

■ धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसच्या वतीने नगरपरिषद येथे श्री.संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि प्रतिनिधी,चंद्रपुर

घुग्घुस:आज दिनांक २० डिसेंबर २०२२ मंगळवार रोजी श्री. संत गाडगे महाराज यांचा ६५ व्या पुण्यतिथी निमित्त आज नगर परिषद कार्यालयात या ठिकाणी संत गाडगे महाराज यांना आदरांजली देण्यात आली श्री.संत गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती असे थोर संत ज्यांनी देशाला एक मोठा संदेशी दिला अश्या संतांचा नावाने शासकीय स्वच्छता मोहीम संपूर्ण देशात राबवत होते परंतु कही कालांतराने या थोर संतांचा विसर पडला आहे. ज्यांनी स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला,नसुन त्यांनी ते कार्य स्वतः प्रत्यक्षात करून दाखवले अशावेळी आमी धोबी परीट जनकल्याण संस्था च्या वतीने सर्व समज बांधव नगर परिषद ला भेट देऊन निवेदन देण्यात आले. कि नगर नारिषद अंतर्गत राबवण्यात येणारी स्वच्छता मोहीम ही संत गाडगे महाराज यांचा नावाने राबववी असे निवेदन देण्यात आहे..

यावेळी अध्यक्ष सचिन क्षीरसागर उपाध्यक्ष विलास भोस्कर सचिव निलेश मुक्के, विनोद भोस्कर, बाबाराव बोबडे, बंडू तुराणकर, मनोज शिरपूरकर, जनार्धन चतुरकर, यादव क्षीरसागर, बबन पत्रकार, बंटी भोस्कर, रामदास क्षीरसागर, रामचंद्र भसारकर सोबतच आम आमदी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर व समाज सेवक पंकज धोटे उपस्थित होते..