Home Breaking News Chandrapur dist@news तलाठी बापूजी गेडाम कडे सोनापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार देवू...

Chandrapur dist@news तलाठी बापूजी गेडाम कडे सोनापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार देवू नका! शेकडों शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे सादर !

286

Chandrapur dist@news

● तलाठी बापूजी गेडाम कडे सोनापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार देवू नका!

● शेकडों शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे सादर !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:शेतक-यांचे व पटवारी वर्गांचे संबंध नेहमीच मधूर व गोड असतात .परंतू काही तलाठी मुद्दाम शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यामुळे अलिकडे काही तलाठ्यांच्या तक्रारी आता जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांकडे येवू लागल्या आहेत.अश्यातच आज सोमवार दि.१९डिसेंबरला जिल्ह्याच्या राजूरा उपविभागातील तलाठी बापूजी वाघुजी गेडाम यांना सोनापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार देवू नये अशी लेखी तक्रार सोनापूर साजातील शेंकडों कास्तकारांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे सादर केली आहे.

सोनापूर साजाला या पूर्वि बापूजी गेडाम नावाचे तलाठी कार्यरत होते.या साजात त्यांनी पाच ते सहा वर्षांचा कालावधी घालवला आहे.याच कालावधीत त्यांनी दलाल मार्फत पैसे घेवून शेतकऱ्यांची कामे केली आहे.ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना सातत्याने त्रास देण्याचा पराक्रम या तलाठ्याने केला त्यामुळे शेतकरी वर्गात आजही त्यांचे विषयी असंतोष खदखदत आहे.सध्या विहीरगांवचा नियमित कार्यभार सांभाळणा-या या तलाठ्याकडे सोनापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार देवू नये अशी मागणी सोनापूर ग्राम पंचायतचे उपसरपंच नागेन्द्र मेश्राम, यांचे सह शेकडों कास्तकारांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे केली आहे.दरम्यान या निवेदनाची एक प्रत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे देखिल सादर केल्याचे समजते.या सोनापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार बापूजी गेडाम कडे सोपविल्यास राजूरा तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा इशारा या पूर्वीच काही शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिला आहे.