Home Breaking News Varora taluka @news जात बाजूला सारून एकजूट होणे महिला सक्षमीकरणाचा पहिला...

Varora taluka @news जात बाजूला सारून एकजूट होणे महिला सक्षमीकरणाचा पहिला टप्पा असावा :ॲड. प्रिया पाटील

231

Varora taluka @news

■ जात बाजूला सारून एकजूट होणे महिला सक्षमीकरणाचा पहिला टप्पा असावा :ॲड. प्रिया पाटील

ग्यानिवंत गेडाम:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा:आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत दत्तोपंत ठेंगळी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, क्षेत्रीय निदेशालय, नागपूर मार्फत दिनांक 20/12/2022 , मंगळवार रोजी येन्सा ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील सभागृहात मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट प्रिया पाटील व प्राध्यापक सुचिता खोब्रागडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन एडवोकेट प्रिया पाटील यांच्या हस्ते झाले, प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी प्रमोद रत्नपारखी व ग्रामपंचायत च्या उपसरपंच सुरेखा लभाने हे होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुशीला तेलमोरे मॅडम होत्या. महिलांनी जातीपातीच्या बेड्या तोडून एकत्रित यावे व लढा द्यावा तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला सुरुवात होईल असे प्रतिपादन एडवोकेट प्रिया पाटील यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना केले. पुढे त्या बोलल्या की महिलांनी शिक्षण घेऊन संघटित रित्या संघर्ष करावा ही काळाची गरज आहे..

प्राध्यापक खोब्रागडे मॅडम यांनी महिलांनी जागरूक होणे महत्त्वाचे असे सांगितले तसेच वर्तमानातील शैक्षणिक घडामोडीवर दृष्टिक्षेप टाकला. अध्यक्ष तेलमोरे मॅडम यांनी महिलांशी हितगुज केली. बहुसंख्येने गावातील महिलांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन बोरीकर मॅडम यांनी केले.याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रमोद रत्नपारखी यांनी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.