Home कृषी Varora taluka @news आदिवासी कोल समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात...

Varora taluka @news आदिवासी कोल समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे-धर्मेंद्र शेरकुरे

83

Varora taluka @news

■ आदिवासी कोल समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे-धर्मेंद्र शेरकुरे

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

वरोरा : वर्षानुवर्षी भटकंती करून जिथे काम मिळेल तिथे पोटाची खडगी भरण्यासाठी कधी दगड खाणीत तर कधी दगड विटा मातीची मिळेल ती कामे करून आपली उपजीविका भागवणे हे नित्याचे. असे एक गाव वरोरा तालुक्यातील चिनोरा हुडकी खदान येथील लोकांना शिक्षणाचा काही गंध नाही,ना त्यांना शासनाच्या सोयी सुविधा, गेल्या तीन पिढ्यापासून आदिवासी कोल समाज कामासाठी स्थायिक झाला. शासन दरबारी तसेच शालेय दप्तरी कोल जात असे नमूद आहे. तरी त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही. कारण त्यांच्याकडे शेत जमिनीचा, जातीची नोंद असल्याचा १९५० चा पुरावा अथवा जन्माचा नोंदीचा पुरावा असल्याचा कोणताही दस्ताऐवज उपलब्ध नसल्याने त्यांना शासकीय सोयी सुविधा व शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

आदिवासी कोल समाज हा अनुसूचित जमाती मधील २६ व्या क्रमांकावर असल्याने त्यांना १९५० चा पुरावा न मागता गृह चौकशीच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी सुभाष शिंदे उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी ब्रिजलाल रौतीया ,विकी राजू राऊत ,सागर प्रेमलाल रौतेल ,विक्रम अनिल रौतेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया:- “” कोल समाजाला अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत मला सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शेरकुरे यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले येत्या ३ जानेवारी ला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चिनोरा हुडकी खदान येथे एकदिवसीय शिबिरामध्ये जातीचे दाखले व अन्य दाखले देण्याबाबत आदेश दिले आहे .
सुभाष शिंदे उपविभागीय अधिकारी वरोरा “”

प्रतिक्रिया:- ‘”” मी बिए पदवी चे शिक्षण पूर्ण केले आहे.माझ्या कडे जात प्रमाणपत्र नसल्याने मला पुढील उच्च शिक्षण घेता आले नाही तसेच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही.मी बेरोजगार आहे.
विक्की राजु रौतेल
रहिवासी हुडकी चिनोरा”””