Home Breaking News Chandrapur city @news रास्त मागण्यांसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेचा मोर्चा धडकणार विधानसभेवर...

Chandrapur city @news रास्त मागण्यांसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेचा मोर्चा धडकणार विधानसभेवर !

321

Chandrapur city@ news

■ रास्त मागण्यांसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेचा मोर्चा धडकणार विधानसभेवर !

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:शासन दरबारी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील कोतवाल बांधवांच्या अनेक रास्त मागण्यां प्रलंबित असून या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २८डिसेंबरला भव्य मोर्चा विधानसभेवर काढण्याचा निर्धार महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी घेतला आहे.अशी माहिती आज चंद्रपूर मुक्कामी कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मेश्राम यांनी या प्रतिनिधीस एका भेटीत दिली.

दरम्यान त्यांनी आज शुक्रवार दि.२३डिसेंबरला सकाळी ११वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले.या निवेदनात प्रामुख्याने कोतवाल संवर्गांकरिता चतुर्थ श्रेणी विचारधीन ठेवून सध्या स्थितीत किमान वेतन देण्यात यावे . कोतवाल बांधवांना सरसकट १५०००हजार रुपयें मानधन देण्यात यावे आदीं रास्त मागण्यां निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करताना जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मेश्राम, उपाध्यक्ष दयाराम वंजारी,तालुकाध्यक्ष निलेश नांदे,तालुका सचिव संदीप थाटे,या शिवाय भोजराज चौधरी ,कुंदन शिंदे, मनोज मडावी, ज्ञानेश्वर वाढई उपस्थित होते.

चंद्रपूर तालुका स्तरावर देखिल तहसीलदार निलेश गौंड यांना कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे एक निवेदन आज सादर केले आहे.