Home Breaking News Chandrapur city@ news साखळी उपोषण तात्पूरते स्थगित ! मनपाने मागण्यां सोडविल्या...

Chandrapur city@ news साखळी उपोषण तात्पूरते स्थगित ! मनपाने मागण्यां सोडविल्या नाही तर अन्नत्याग आंदोलन करु राहूल देवतळेंने दिला इशारा!

232

Chandrapur city@ news

■ साखळी उपोषण तात्पूरते स्थगित !
■ मनपाने मागण्यां सोडविल्या नाही तर अन्नत्याग आंदोलन करु राहूल देवतळेंने दिला इशारा!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर शहराच्या विठ्ठल मंदीर वार्ड प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून या बाबतीत चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी मनपा प्रशासनाला अनेकदा निवेदन सादर केली आहे .परंतू मनपा प्रशासनाने त्यांचे कुठल्याही निवेदनाची दखल घेतली नाही.शेवटी राहुल देवतळे यांनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या समस्यां दूर होवून स्थानिक विठ्ठल मंदीर प्रभागात नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी देवतळे यांची प्रामाणिक इच्छा आहे .त्या साठीच त्यांनी हे साखळी उपोषण सुरु केले होते.दरम्यान या उपोषणाला जनतेंनी ही भरभरुन प्रतिसाद देत राहुल देवतळे यांची मागणी रास्त असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल व्यक्त केली.

२१डिसेंबरला मनपा कार्यालय समोर देवतळे यांनी उपोषण सुरु करताच त्याच दिवशी संध्याकाळी मनपा प्रशासनाने त्यांना या मागण्या संदर्भात चर्चेसाठी बोलाविले तातडीने या मागण्या सोडवू असे आश्वासन त्यांना दिले त्यामुळे देवतळे यांनी आपले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचे त्यांनी आज सांगितले .

येत्या दहा दिवसांत उपरोक्त मागण्यांची पूर्तता न झाल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा मनपा प्रशासनाला देवतळे यांनी दिला आहे. १८२दिवस पाणी पुरवठा पण ३६५ दिवसांचा पाणीकर नागरिकांना का आकारला जातो या बाबत देवतळे यांना समाधानकारक उत्तर मनपा प्रशासनाकडून मिळाले नसल्याचे देवतळे यांनी सांगितले.

एका करारानुसार शहरात हा पाणी पुरवठा केला जातो असे एका लेखी पत्रातून मनपाने देवतळे यांनी कळविले आहे.कर आकारणीचा व नियमित पाणी पुरवठा हे प्रश्न जनतेच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचे असल्याचे देवतळे यांनी म्हटले आहे.सामाजिक कार्यात नेहमीच राहुल देवतळे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.सर्व प्रथम त्यांनी विठ्ठल मंदीर वार्ड प्रभागातील अतिशय महत्वाचा प्रश्न उचलून धरला हे विशेष!