Home Breaking News Chandrapur city@ news बाॅईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळणार ! ...

Chandrapur city@ news बाॅईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळणार ! चंद्रपूरचे अपक्ष आ.किशोर जोरगेवार यांचा विश्वास ! उद्याला यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली ! नागपूर विधान भवनावर धडकणार !

899

Chandrapur city@ news

■ बाॅईक रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळणार !

■ चंद्रपूरचे अपक्ष आ.किशोर जोरगेवार यांचा विश्वास !

■ उद्याला यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली !

■ नागपूर विधान भवनावर धडकणार !

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:चंद्रपूर जिह्यातील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत द्या या प्रमुख मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार असुन या बाईक रॅलीत हजारों दुचाकींचा समावेश राहणार आहे. आमदार जोरगेवार यांनी या बाबतच्या तयारीची पाहणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्या हा विज उत्पादक जिल्हा आहे. कोळश्यावर आधारीत विज प्रकल्प येथे चालत असल्याने चंद्रपूरकरांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्या स्वरुप चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

याच मागणीसाठी अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वात आयोजित अधिकार बाईक रॅलीची जय्यत तयारी सुरु असुन उद्या सोमवारी सकाळी ७ वाजता स्थानिक गांधी चौकातुन या रॅलीला सुरुवात होत आहे. सदरहु बाईक रॅलीमध्ये चंद्रपूरसह जिल्हाभरातुन नागरिक गांधी चौक येथे पोहचणार आहे .या रॅलीची जय्यत तयारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान आज आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर ते नागपूर या रॅलीच्या मार्गाची व येथील तयारीची पाहणी केली आहे. या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत असुन ही बाईक रॅली भव्य निघणार असल्याचा विश्वास आमदार जोरगेवार यांनी आज व्यक्त केला आहे.