Home Breaking News Varora city@ news आयुष्यमान योजनेचा लाभ जनतेने घ्यावा . वरोरा...

Varora city@ news आयुष्यमान योजनेचा लाभ जनतेने घ्यावा . वरोरा नगरपरिषदेचे आवाहन.

547

Varora city@ news

■ आयुष्यमान योजनेचा लाभ जनतेने घ्यावा .

■वरोरा नगरपरिषदेचे आवाहन.

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा:राज्यशासन व केंद्रशासनाने सर्वसामान्य,गोरगरिबांना परवडणाऱ्या आरोग्य योजना अंमलात आणल्या असून यामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना,महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्भूत आहे. हृदयरोग, कॅन्सरसारख्या 1209 दुर्धर आजारासाठी प्रति कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रुपयांचे विमा कवच राहणार आहे.

सामाजिक आर्थिक मागास जनगणना 2011 चा डाटा नुसार शासनाकडून यादी प्रसिद्ध झाली असून यादी नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय आणि सीएससी केंद्रावर उपलब्ध आहे.वरोरा शहरातील 7 केंद्रावर आयुष्मान कार्ड काढण्याची सोय उपलब्ध आहे.

नागरिकांनी संबंधित केंद्रात जाऊन आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे,सोबत रेशन कार्ड, आधारकार्ड मूळ प्रत घेऊन जाणे अनिवार्य आहे.एकूण 12 हजार लाभार्थी असून आतापर्यंत शहरातील 2000 लाभार्थ्यांची योजनेचा लाभ नगरपरिषद , उपजिल्हा रुग्णालय आणि इतर केंद्रावरून घेतला आहे.

आयुष्यमान आरोग्य योजना नोंदीसाठी नगरपरिषद प्रशासन व उपजिल्हा रुग्णालय आणि इतर केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी केले आहे.