Home चंद्रपूर Varora taluka@ news आनंद निकेतन महाविद्यालय हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन.

Varora taluka@ news आनंद निकेतन महाविद्यालय हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन.

924

Varora taluka@ news

■ आनंद निकेतन महाविद्यालय हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन.

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा:शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर काळे सर यांचे हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य राधा सवाने यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात उस्फूर्तपणे भाग घेतला. कागद ,रिफील , खराब झालेल्या पेन, प्लास्टिक सुतळी, लोकर ,चहाचे कप अशा विविध वस्तू वापरून विद्यार्थ्यांनी सुंदर वस्तू तयार केल्या. यामध्ये सजावटीच्या वस्तू पायपुसणे ,वॉल हैंगिंग फ्लावर पॉट, फोटो फ्रेम पेंटिंग अशा अनेक विविध वस्तू विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवले.

प्रदर्शनाच्या आयोजन करिता किरण लांजेवार मॅडम आणि दिप्ती चिटणीस मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. नागपुरे सर,वसाके सर,मेश्राम सर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.