Home Breaking News वना नदीवरील अपुरा बंधारा प्रकरण मार्गी लावा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ...

वना नदीवरील अपुरा बंधारा प्रकरण मार्गी लावा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे बंधारा पूर्ण झाल्यास हिंगणघाट शहरातील पाणीटंचाई होणार दूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे साकडे.

399

Hinganghat district@ news

■ वना नदीवरील अपुरा बंधारा प्रकरण मार्गी लावा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

■ बंधारा पूर्ण झाल्यास हिंगणघाट शहरातील पाणीटंचाई होणार दूर.

■ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे साकडे.

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम (विशेष प्रतिनिधी)

हिंगणघाट:-१४ जानेवारी २०२३
महाराष्ट्र सुजल अभियानाअंतर्गत हिंगणघाट येथिल वणा नदी बंधा-यावर के. टी. वेअर बांधणे, इंस्पेक्शन चेंबर बांधणे, ११०० मि.मि. व्यासाची कनेक्टींग मेन टाकणे, पुरामुळे नदीची माती थड वाहुन गेल्याने निर्माण झालेली गॅप बुजविण्याकरीता रिटेलिंग भिंत व स्टोन पिचींगच्या कामासाठी सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान करण्याबाबत माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
संदर्भ सह १) शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सुनिअ २००१ प्र. क्र. ५६ पापु २२ दि.१० जुलै २००१
२) शासन निर्णय नगर विकास विभाग क्र. संकिर्ण २००८/१३३८/ प्र.क्र.१७१/०८ /नवि-२० दि . मार्च २००१
३) मुख्य अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा पुणे यांचे प्र.क्र.मु.अ. /प्र.व्य.स. से. त. शा. -२/९८५ दि. ०९.०५.२०१३
४) अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (गुणवत्ता परिक्षण पथक) यांचे दि.०७ जुन २०१३ चे पत्र
५) मुख्य अभियंता महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधीनी, नाशिक यांचे पत्र क्र. १४०४/ दि. १ जुलै २०१३
उपरोक्त संदर्भिय शासन १ व २ विषयांकित बंधारा बांधकामास शासनाची मंजुरी प्राप्त झाली असुन त्यानुसार नगर परिषदेने बंधारा कामाची कार्यवाही केली असुन बंधारा बांधकामामध्ये काही बाबींमध्ये वाढ झाल्याने बंधा-याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.
प्रकरणात नगर पालिकेने कार्यालयीन पत्र क्र. नपाहि/मुअ/कावि-५२०/२०१३ दि.१५.०१.२०१३ अन्वये मा. प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छ विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अहवाल सादर केलेला आहे. बंधा-याच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेकडुन तपासणी करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने मुख्य अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागर सेवा, पुणे यांना विनंती केली असता संदर्भिय पत्र क . ३ अन्वये सदर तपासणी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (गुणवत्ता परीक्षण पथक) यांनी संदर्भिय पत्र क. ४ अन्वये सदर तपासणी मुख्य अभियंता, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे कडुन
त्यानुसार सदर प्रस्ताव तपासणी करता अमरावती येथे सादर केला असता त्यांचे विभागाकडुन सदर कामाचे क्षेत्र वर्धा जिल्हा अंतर्गत येत असल्याने नागपुर परिमंडळ पाटबंधारे विभाग यांचेकडे देण्यात यावे असे सुचविले. त्यामुळे सदर प्रस्ताव संबंधित विभागाकडे नागपुर येथे प्रत्यक्ष देण्यात आला. परंतु संबंधित विभागाकडुन सुध्दा कामाची तपासणी हया विभागाकडुन करण्यात येणार नसल्याचे सांगितले.
तरी विनंती करण्यात येते की, सदर प्रकरणी संबंधित सर्व अधिका-यासह मंत्रालयामध्ये बैठक लावुन बंधारा बांधकामासाठी प्रकरण मार्गी लावण्यात यावे असे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन साकडे घातले.