Home Breaking News Varora taluka@ news सालोरी येन्सा ब्लॉक मजरा येथे बिरसा मुंडा जयंती...

Varora taluka@ news सालोरी येन्सा ब्लॉक मजरा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

439

 

varora taluka @news

■ सालोरी येन्सा ब्लॉक मजरा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा:वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॉक मजरा येथे आदिवासी समाज क्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व उल गुलाल आंदोलनाचे संस्थापक, आदिवासीचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांचा जयंतीच्या कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सर्वप्रथम आदिवासी पारंपारिक पद्धतीने पूजन करून आदिवासी वेशभूषा परिधान करून आदिवासीच्या वाद्यासह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी विविध आदिवासी लोक गीतावर पारंपारिक नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधले.

यावेळी झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पेन्दोर सामाजिक कार्यकर्ते वरोरा, कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र जुमनाके, प्रमुख पाहुणे उपसरपंच प्रमोद तोडासे, हर्षद निब्रड, प्रतिभा मानकर, अनिता आत्राम, मायाताई बोढे, कौतुक मगरे, पत्रकार ग्यानीवंत गेडाम, व सामाजिक कार्यकर्ते धनराज वांढरे यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांनी जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. यावेळी आल्फर गावचे लहान मुलांनी अप्रतिम गोंडी डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन इंदु राऊत मॅडम यांनी केले तर प्रस्ताविक रवी किंन्नाके व आभार प्रदर्शन उपसरपंच प्रमोद तोडासे यांनी केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते कैलास तोडासे, सुरेश मेश्राम, रवी किन्नाके, संजय आत्राम, विठ्ठल आत्राम, राजू जुमनाके, गणेश तोडासे, गिताबाई आत्राम, सुनिता जुमनाके, रंजना तोडासे यांनी अतिशय परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमासह सहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता.