Home Breaking News Ballarpur taluka @news महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती...

Ballarpur taluka @news महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

184

Ballarpur taluka @news

■ महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

सुवर्ण भारत:ताहीर शेख
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील इतिहास विभागाद्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. किशोर चौरे, इतिहास विभागप्रमुख, यांनी आपल्या भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यावर व त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात प्रभाव यावर प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्याणी पटवर्धन मॅडम होत्या. कार्यक्रमात रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. रजत मंडल, डॉ. रोशन साखरकर, प्रा. टेकाडे , प्रा. सतीश कर्नासे, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.