Home Breaking News शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं;राज्य सरकारचा मोठा निर्णय

शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं;राज्य सरकारचा मोठा निर्णय

101

■शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं;राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – शिक्षण सेवकांसाठी मोठी बातमी आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याबाबत सरकारने आज अध्यादेश काढून मानधनाबाबत आदेश काढले आहेत.

राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे.

प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

माध्यमिक शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये ८ हजार रुपयांवरुन १८ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.

तर माध्यमिक शिक्षण सेवकांचं वेतन ९ हजार रुपयांवरुन २० हजार रुपये करण्यात आलेलं आहे.

आज महाराष्ट्र शासनाने याबाबतचा जीआर काढला आहे.

शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय २२ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला होता. त्याचा प्रत्यक्ष जीआर निघाल्याने शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून मानधन वाढीसाठी आंदोलने झालेली आहेत.

सरकार दरबारी विविध संघटनांनी गाऱ्हाणं मांडलं होतं. अखेर आज मानधन वाढीबाबत निर्णय झाला आहे.