Home Breaking News Savli taluka@ news सावली तालुका कांग्रेस तर्फे जात निहाय जनगणना करण्यात यावी...

Savli taluka@ news सावली तालुका कांग्रेस तर्फे जात निहाय जनगणना करण्यात यावी यासाठी प्रधानमंत्री यांना निवेदन पटविली

301

Savli taluka@ news
■ सावली तालुका कांग्रेस तर्फे जात निहाय जनगणना करण्यात यावी यासाठी प्रधानमंत्री यांना निवेदन पटविली

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

सावली : सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालय सावली येथे OBC जनगणना झाली पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले नुकतेच बिहार राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना सुरू झालेली आहे .राजस्थान , कर्नाटक या राज्याने जातनिहाय जनगणना केलेली आहे.तसेच छत्तीसगड ,ओडिसा ,तामिळनाडू या राज्यामध्ये सुद्धा जात निहाय जनगणना होणार आहे.याचा उपयोग त्या त्या राज्याच्या विकासासाठी होणार आहे.महाराष्ट्रात सुद्धा जात निहाय जनगणना करण्याबाबतची 33 वर्षापासून ची मागणी प्रलंबित आहे .

जनगणना हा विषय केंद्र शासनाची संबंधित आहे मात्र जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केलेली आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी.तसा ठराव ९ जानेवारी 2020 रोजी तत्कालीन सभापती नानाभाऊ पटोले यांनी सभागृहात मांडला होता आणि तो ठराव सर्व राजकीय पक्षांनी एकमताने मंजूर केलेला आहे .
देशातील जातनिहाय जनगणना करून ९० वर्षे पूर्ण झालेली आहे .स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांची जात निहाय तर इतर सर्वांची एकत्रित करण्याचे धोरण स्वीकारले .

यामुळे मागासवर्गीय असलेले ओबीसी वंचितच राहिले आहेत सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग या आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले.५ मे २०१० ला संसदेत तत्कालीन सदस्य समीर भुजबळ ,स्व.गोपीनाथराव मुंडे, लालूप्रसाद यादव, स्व.मुलायमसिंग यादव ,शरद यादव यांचे सह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला होता.त्यातून २०११ ते २०१४ मध्ये केंद्र सरकारने सामाजिक व आर्थिक जात गणना केली . मात्र त्याची आकडेवारी जाहीर केलेली नाही.सन २०१७ साली देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना जातनिहाय करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते . मात्र आपल्या देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगणनेचे काम अजून पर्यंत व्हायचे आहे .
यामुळे बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा जनगणने सोबतच जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी जात निहाय जनगणना करण्यात यावी यासाठी सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळातर्फे मा.पंतप्रधान, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता यांना तहसीलदार सावली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.जर मागासवर्गीयांची जातीनिहाय जनगणना झाली नाहीतर संपूर्ण भारतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जन आंदोलन उभारू व ओबीसी समाजाला न्याय मिळवून देऊ अशे आवाहन तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश पा.चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, प.स.सावलीचे माजी सभापती विजय कोरेवार,सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, सावली न.प.च्या नगराध्यक्षा लताताई लाकडे,सावली शहराध्यक्षा भारती चौधरी,सावली न.प.उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,जिबागावचे सरपंच पुरषोत्तम चुदरी, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, न.प.सावलीचे नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन संगीडवार नगरसेवक, ज्योती शिंदे नगरसेविका, साधना वाढई नगरसेविका,अंजली देवगडे नगरसेविका,ज्योती गेडाम नगरसेविका,दिलीप लटारे, विजय गड्डमवार,अनिल मशाखेत्री,अनिल गुरुनुले, रुपकांत मोहुर्ले, शामराव बाबनवाडे , उमाजी दांडिकवार, कविताताई मुत्यालवार, अंजली दमके, शिला गुरुनुले तसेच कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडिया आणी सर्व सेल चे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.