Home Breaking News Savli taluka @news सावली तालुक्यात हात से हात जोडो अभियाना-संबंधित आढावा बैठक...

Savli taluka @news सावली तालुक्यात हात से हात जोडो अभियाना-संबंधित आढावा बैठक संपन्न काँग्रेस,महिला कांग्रेस आणि युवक कांग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन हात से हात जोडो अभियानाला यशस्वी करा:नितीन गोहणे

266

Savli taluka @news
■ सावली तालुक्यात हात से हात जोडो अभियाना-संबंधित आढावा बैठक संपन्न

■ काँग्रेस,महिला कांग्रेस आणि युवक कांग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन हात से हात जोडो अभियानाला यशस्वी करा:नितीन गोहणे

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

सावली:सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे हात से हात जोडो अभियाना-संबंधित आढावा बैठक संपन्न झाली.नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढून लोकात प्रेमभावना निर्माण केली याचं धर्तीवर त्यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे २६ जानेवारी २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात हात से हात जोडो अभियान राबविण्यात येत असून त्याबद्दल ची आढावा बैठक घेण्यात आली.

त्यामध्ये लोकात जाऊन त्यांचा समस्या जाणून घेणे, एकोपा निर्माण करणे ,पक्षवाढीसाठी कार्यरत असणे हे याचे उद्देश तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी सर्व कार्यकर्त्यांना समझवून सांगितले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश पा.चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, प.स.सावलीचे माजी सभापती विजय कोरेवार,सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, सावली न.प.च्या नगराध्यक्षा लताताई लाकडे,सावली शहराध्यक्षा भारती चौधरी,सावली न.प.उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,जिबागावचे सरपंच पुरषोत्तम चुदरी, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, न.प.सावलीचे नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन संगीडवार नगरसेवक, ज्योती शिंदे नगरसेविका, साधना वाढई नगरसेविका,अंजली देवगडे नगरसेविका,ज्योती गेडाम नगरसेविका,दिलीप लटारे, विजय गड्डमवार,अनिल मशाखेत्री,अनिल गुरुनुले, रुपकांत मोहुर्ले, शामराव बाबनवाडे , उमाजी दांडिकवार, कविताताई मुत्यालवार, अंजली दमके, शिला गुरुनुले तसेच कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडिया आणी सर्व सेल चे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.