Home Breaking News Chandrapur dist@ news राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण उद्या भद्रावती...

Chandrapur dist@ news राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण उद्या भद्रावती नगरीत! कार्यक्रमाला महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे- किरण साळवी यांचे आवाहन !

106

Chandrapur dist@ news
■ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण उद्या भद्रावती नगरीत!

■ कार्यक्रमाला महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे- किरण साळवी यांचे आवाहन !

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

चंद्रपुर:विदर्भातील नागपूर व वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनजागरण यात्रेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आती ती (जनजागरण)यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात पोहचली आहे . दरम्यान आज मंगळवारी (१४फेब्रुवारीला ) मूल नगरीत संध्याकाळी ६वाजता एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या बुधवारी (१५फेब्रुवारीला) दुपारी ही जनजागरण यात्रा औद्योगिक भद्रावती नगरीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी १२:३०वाजता पोहचत आहे.या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जनजागर यात्रा निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राज्य निरीक्षक डॉ.आशाताई मिरगे , राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे,नागपूर विभागीय महिला अध्यक्ष शाहीन हकीम, चंद्रपूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा महिलाध्यक्षा बेबीताई उईके व अन्य पदाधिकाऱ्यांचे भद्रावती नगरीत उद्या (बुधवारी )आगमन होत आहे . दरम्यान होवू घातलेल्या या कार्यक्रमाला भद्रावती तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाध्यक्षा किरण साळवी यांनी केले आहे.