Home Breaking News Chandrapur dist @news चंद्रपूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाची चौकशी करुन...

Chandrapur dist @news चंद्रपूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाची चौकशी करुन “त्या” दोषींना तातडीने निलंबीत करा- राजु झोडेंची मागणी ! विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने दिले पोलिस अधिक्षकांना निवेदन! निवेदन सादर करताना अनेकांची उपस्थिती!

134

Chandrapur dist @news

■चंद्रपूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाची चौकशी करुन “त्या” दोषींना तातडीने निलंबीत करा- राजु झोडेंची मागणी

■विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने दिले पोलिस अधिक्षकांना निवेदन

■निवेदन सादर करताना अनेकांची उपस्थिती

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

चंद्रपुर: जिल्ह्यात मागील दिवसात काही पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे स्थानांतर झाले आहे .त्यातच चंद्रपूर लगतच्या पडोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांची वर्णी जिल्हा गुन्हे अन्वेषण पोलिस निरिक्षक पदी लागली . दरम्यान पोलिस निरिक्षक कोंडावार यांनी रुजू होताच धडक कारवाई करण्याच्या नादात फुले,शाहू, आंबेडकर विचारवंत, लेखक, तथा साहित्यिक पवन भगत व आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांवर अवैध जुगार कायद्यांतर्गत कारवाई केली.

बेकायदेशिरपणे पोलिस बळाचा वापर करीत घरुन घरी कोणीही नसताना आलमारी तोडून त्यातील ९५०००/- हजार रुपये घेऊन गेले. त्या नंतर मोहन तोकलवार यांच्या घरुन त्याच्या आईने ठेवलेले बचत गटाचे ११००००/- (एक लाख दहा हजार रुपये )व माजी नगरसेवक ंआंनद रामटेके यांचे कडून प्रत्यक्ष १५०००(पंधरा हजार रुपये )असे लाखों रुपये बळजबरीने हस्तगत केले. कारवाई मध्ये मात्र केवळ १७०००(सतरा हजार रूपये) दाखविण्यात आले. यातील हस्तगत केलेली काही रक्कम पोलिसांनी कुठे अफरातफर केली. याचा शोध घ्यावा व सखोल चौकशी करुन संबधित पोलिसांच्या विरोधात तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी उलगुलान संघटना व दलित पंथर संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे कडे एका लेखी निवेदनातून आज करण्यात आली आहे.

बल्लारपूर येथे दि.९/२/२३ला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संदिग्ध कारवाई करण्याच्या उद्देशाने मोहन तोकलवार स्वप्नील बागेसर व पवन भगत, आनंद रामटेके यांच्यावर १२ जुगार अॅक्ट नुसार कारवाई केली.

मोहन तोकलवार यांच्या घरून १ लाख १० हजार रूपयें यांच्या आईचे महिला बचत गटाचे पैसे दमदाटी करून घेवून गेले. तसेच डॉ. झाकीर हुसैन वार्ड, बल्लारपूर येथील पवन भगत यांचे घरून ते घरी नसतांना ९५ हजार रूपये घेवून गेले. सदरहु रक्कम एल.सी.बी. पथकांनी आपसात वाटून घेतली असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात केला आहे.
उपरोक्त प्रकरणात योग्य चौकशी करुन संबधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे, दलित पंथर जिल्हा अध्यक्ष रुपेश निमसरकार, सुरेश नारनवरे, जितेंद्र डोहणे, सुधीर लाडे, पवन भगत, गुरु भगत, आदींनी केली आहे.