Home Breaking News Chandrapur dist@ news पांदन रस्त्यासाठी सरपंच संजय उकिनकर ,गजानन सातपूते व...

Chandrapur dist@ news पांदन रस्त्यासाठी सरपंच संजय उकिनकर ,गजानन सातपूते व प्रविण बोबडेंचे चंद्रपूरात बेमुदत उपोषण!

211

Chandrapur dist@ news

■ पांदन रस्त्यासाठी सरपंच संजय उकिनकर ,गजानन सातपूते व प्रविण बोबडेंचे चंद्रपूरात बेमुदत उपोषण!

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

चंद्रपुर:चंद्रपूर तालुक्यातील अंतुर्ला सोनेगांव येथे पांदन रस्ता मंजूर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सोनेगांवचे सरपंच संजय उकिनकर , गजानन सातपूते व प्रविण बोबडे हे आज मंगळवार दि.१४ फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. महादेव उकिनकर ते भारत भोयर यांच्या शेता पर्यंत व रामदास उकिनकर ते बांदुरकर यांचे शेता पावेतो पांदन रस्ता तयार करण्यात यावा अशी सोनेगांव ग्रामस्थांची रास्त मागणी असून त्यांनी या मागणीसाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे.परंतु आज पावेतो त्यांचे या आवश्यक व महत्वाच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही.

त्यामुळे सरपंचासह अन्य दोघांनी आजपासून बेमुदत उपोषण आरंभ केले आहे.दरम्यान या आंदोलनाची माहिती ग्राम पंचायत सोनेगांवचे सरपंच संजय उकिनकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एका लेखी स्वरूपात दिली आहे.