Home Breaking News (कविता) काव्य कुंज शब्द

(कविता) काव्य कुंज शब्द

149

(कविता) काव्य कुंज शब्द

सुचलेल्या शब्दातून पसरले शब्दकिरण वाचते निळे आभाळ
शुभ्र पहाटेच्या ओल्या नभात
गाजतो उंबरठा मखमली पाऊला खाली

दारात गर्दी नुसती सावल्यांची
किरणांनी सुखावली रत्नावली काजव्यांची कोरले स्वप्न पहाटेचे
शब्द शब्द रीते जहाले तुझ्यासवे बोलतांना

मंदावला तारा बोलक्या कुजबुजनाऱ्या वाऱ्याच्या कानात
हळूच पाऊल वाजले पैंजणाच्या
रिक्त स्वरात

कुणा ना कळले मेघांचे गरजणे
रीत्या थेंबात ओल्या नभाचा अवकाश थांबली रात्र जागा झाला प्रकाश

प्रा. डॉ. वैशाली भांडारकर सहजं सुचलं सदस्य
महिला कला महाविद्यालय, उमरेड,8380893706