Home Breaking News Chandrapur city @ news चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिरात चार दिवसीय भजन महोत्सवाचे...

Chandrapur city @ news चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिरात चार दिवसीय भजन महोत्सवाचे आयोजन ! यंग चांदा ब्रिगेडचा पुढाकार !

106

Chandrapur city @ news

■चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिरात चार दिवसीय भजन महोत्सवाचे आयोजन !

■ यंग चांदा ब्रिगेडचा पुढाकार !

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधि

चंद्रपुर: महाशिवरात्री निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर प्रांगणात चार दिवसीय विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन येत्या 18 फेब्रुवारीला यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक ,अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदरहु भजन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सदरहु भजन महोत्सव येत्या 21 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे .जिल्ह्यातील भजन मंडळांनी या भजन महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

भजन मंडळांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करीता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मागील वर्षा पासुन महाशिवरात्री निमित्त भजन महोत्सव आयोजित केल्या जात आहे. यंदाही महाशिवरात्री निमित्त येत्या 18 फेब्रुवारीला अंचलेश्वर मंदिराच्या प्रांगणात विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहु भजन महोत्सव चार दिवस चालणार असुन 21 फेब्रुवारीला भजन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यात विविध भाषीय शेकडों भजन मंडळ सहभागी होणार आहे.

युवा पिढीला भजनाची आवड निर्माण व्हावी व भजनाच्या मधुरतेने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे हा सुध्दा या भजन महोत्सवाच्या आयोजनाचा मागचा एक उद्देश आहे. शहरातील नागरिकांनी आणि भजन मंडळांनी सदरहु भजन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदनीसाठी भजन मंडळांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कळविण्यात आले आहे.