Home Breaking News Savli taluka @news हात से हात जोडो अभियाना-संबंधित सावली तालुका काँग्रेस...

Savli taluka @news हात से हात जोडो अभियाना-संबंधित सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे फिरता दौरा संपन्न

91

Savli taluka@ news
हात से हात जोडो अभियाना-संबंधित सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे फिरता दौरा संपन्न

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी, चंद्रपुर

सावली:दिनांक:१७-०२-२०२३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढून लोकात प्रेमभावना निर्माण केली याचं धर्तीवर त्यांची प्रेरणा घेऊन नाना पटोले प्रांताध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे २६ जानेवारी २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात हात से हात जोडो अभियान राबविण्यात येत आहे.

त्यामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष, व सर्व सेलच्या अध्यक्ष तथा पदाधिकार्यांनी लोकात जाऊन त्यांचा समस्या जाणून घेणे, पक्षांतर्गत एकोपा निर्माण करणे ,पक्षवाढीसाठी कार्यरत असणे हे याचे उद्देश आहेत. सावली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी सूचना मिळताच तात्काळ आमदार विजय वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालयात त्या संबंधी आढावा बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांना हात से हात जोडो अभियानाची रूपरेषा समजावून सांगितले.
व त्यानुसार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ ला हात से हात जोडो अभियाना-संबंधित सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे फिरता दौरा सावली तालुक्यातील रुद्रापूर, कवठी आणी पारडी या ग्रामीण भागातील गावात आयोजित करण्यात आले होते.
या वेळी तिन्ही गावातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत , केंद्रातील मोदी सरकारच्या व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या हुकूमशाही धोरांना विरुद्ध,भाववाढ, आणी बेरोजगारी, भ्रष्टाचार या प्रश्नांना या अभियाना द्वारे लोकजागृती करण्यात आली. काँग्रेस हाच पक्ष भारतातील जनसामान्यांचा शेतकरी, भूमिहीन मजूर, गरीब जनता, कामगारांचा आवाज संसदेत उठवू शकतो, या माध्यनातून लोकांच्या मनातील भावनिक प्रतिक्रिया दिसून आल्या.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विचारांना कोणत्याहि प्रकारचा तडा जाऊ देणार नाही व येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नंबर एक वर आणू असा विश्वास नागरिकांनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,प.स.सावलीचे माजी सभापती विजय कोरेवार,सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, सावली न.प.च्या नगराध्यक्षा लताताई लाकडे,सावली शहराध्यक्षा भारती चौधरी,सावली न.प.सावलीचे नगरसेवक प्रफुल वाळके,सचिन संगीडवार नगरसेवक,ज्योती शिंदे नगरसेविका, साधना वाढई नगरसेविका,अंजली देवगडे नगरसेविका,रुद्रापुर येथील काँग्रेस कार्यकर्ते लालाजी पा.भोयर, ग्राम कमीटीचे अध्यक्ष खुशाल राऊत, पुरषोत्तम पेंदाम, तसेच कवठी येथील सरपंच कांताबाई बोरकुटे, व कार्यकर्ते प्रकाश घोटेकर आणी पारडी येथील सरपंच बंडू मेश्राम ,रवी गेडेकार,आनंदराव गोहने, निता नरुले,ओमप्रकाश पोटे,तसेच विजय गड्डमवार,अनिल गुरुनुले,दिलीप लटारे, राजेंद्र भोयर, कविताताई मुत्यालवार,शिला गुरुनुले तसेच कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडिया आणी सर्व सेल चे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
सावली तालुक्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्ते व सर्व सेल च्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत एकत्रित येऊन हात से हात जोडो अभियानाला यशस्वी केले त्याबद्दल तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांनी उपस्थित नागरिक कार्यकर्ते व सर्व सेलच्या पदाधिकार्यांन्चे आभार मानले