Home Breaking News Chandrapur dist@ news चंद्रपूर जिल्हास्तरीय खेळाडू व स्पर्धक होतेय नागपूर कडे...

Chandrapur dist@ news चंद्रपूर जिल्हास्तरीय खेळाडू व स्पर्धक होतेय नागपूर कडे रवाना! किक्रेट संघात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश !

90

Chandrapur dist@ news

■ चंद्रपूर जिल्हास्तरीय खेळाडू व स्पर्धक होतेय नागपूर कडे रवाना!

■ किक्रेट संघात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश !

सुवर्ण भारत: किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपुर:आत्मविश्वास व विविध स्पर्धेतील दांडगा अनुभव या बळावर चंद्रपूर जिल्हा स्तरावरील महसूल विभागातील खेळाडू व सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक दि.२४ फेब्रुवारीला रात्री नागपूर कडे रवाना होत असल्याचे वृत्त आहे.दरम्यान येत्या २५फेब्रुवारी पासून नागपूर मुक्कामी तीन दिवसीय विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आरंभ होत आहे.या विविध स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा स्तरावरील १०५स्पर्धक भाग घेत असल्याचे समजते.महसूल कर्मचारी वर्गांसाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते.

कोरोनामूळे दोन वर्ष या स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. या वर्षी थाटात सदरहु स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .होवू घातलेल्या विविध स्पर्धेत चंद्रपूर जिल्हास्तरीय चमू सहभागी होत आहे.नागपूर मुक्कामी होणा-या विविध स्पर्धेपैकी सर्वाधिक लक्ष वेधले आहे ते किक्रेट सामन्याकडे ! चंद्रपूर जिल्हा स्तरावर या पूर्वी आयोजित केलेल्या किक्रेट सामन्यात ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी दाखविली अश्या खेळाडूंना जिल्हा किक्रेट संघात स्थान दिले आहे.

जिल्हा निवड समितीने किक्रेट संघात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यातील उमेश बुच्चे , प्रणय पवार,(भद्रावती ) परिक्षीत पाटील( सावली) अमोल आखाडे (वरोरा)समिर वाटेकर (भद्रावती)अजय गाडगे (बल्हारपूर) गणेश जगदाळे (सिंदेवाही ) सुरेश राठोड (गोंडपिंपरी,)राहुल फणसे , (वरोरा )शैलेन्द्र धात्रक (चंद्रपूर )यांचा समावेश आहे.राखीव खेळाडू मध्ये गजानन उपरे, ओंकार ठाकरे ,व सुरजीत चौधरीचा समावेश आहे.

नागपूरात या पूर्वी झालेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा संघाची कामगिरी उल्लेखनीय नेत्रदीपक व कौतुकास्पद राहिलेली आहे.हे विशेष!या ही आयोजित केलेल्या स्पर्धेत जिल्हा स्तरीय चमू चमकदार कामगिरी दाखवतील असा महसूल विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ठाम विश्वास आहे.

दोन वर्षा अगोदर याच नागपूरात झालेल्या विविध स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा संघाने अनेक पारितोषिके मिळवून स्वता सोबत जिल्ह्याचे नाव रोशन केले होते.त्या वेळेस त्यांचेवर अभिनंदनांचा अक्षरशः वर्षाव झाला होता.किक्रेट सामन्यातील अनेक खेळाडू अष्टपैलू खेळाडू असून जिल्हा स्तरावर आयोजित सामन्यात त्यांची कामगिरी प्रशांसनिय अशीच होती.चौफैर फटकेबाजी करणारे अमोल आखाडे व शैलेन्द्र धात्रक नागपूर मैदानावरील सामने खिश्यात घालण्यासाठी वेगळी रणनिती व डावपेच आखतील यात शंका नाही.किक्रेट मधील दांडगे अनुभव त्यांचे पाठिशी आहे.