Home Breaking News Chandrapur dist@ news लाच मागणी प्रकरणात अडकले मंडळ अधिकारी व कोतवाल...

Chandrapur dist@ news लाच मागणी प्रकरणात अडकले मंडळ अधिकारी व कोतवाल ! चंद्रपूर एसीबीची यशस्वी कारवाई!

109

Chandrapur dist@ news

■ लाच मागणी प्रकरणात अडकले मंडळ अधिकारी व कोतवाल !
■ चंद्रपूर एसीबीची यशस्वी कारवाई !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपुर:एका लाच मागणी प्रकरणात काल ( दि.२३फेब्रुवारीला) चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील मंडळ अधिकारी धनंजय लूमदेव बुराडे व किटाळीचा कोतवाल राहुल सिध्दार्थ सोनटक्के यांच्या वर चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याचे वृत्त आहे.दरम्यान या बाबतीत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते की आजोबाच्या शेतीचा (मृत्यू पत्राचा) फेरफार रुजूवात करण्यासाठी शंकरपूरचे मंडळ अधिकारी धनंजय बुराडे व कोतवाल राहुल सोनटक्के यांनी तक्रारदारास तब्बल सात हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्या नंतर या सौद्यात थोडीफार तडजोड झाली.व पाच हजार रुपयांत हा सौदा पक्का झाला.परंतु ही रक्कम देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. शेवटी त्याने चंद्रपूरातील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले व या लाचखोरांची रितसर तक्रार नोंदविली.

एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता लाचखोरांनी लाच मागितल्याचे दिसून आले .त्या अनुषंगाने एसीबी पथकाने काल शुक्रवारला या दोघां लाचखोरां बाबत भिसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणा बाबत चौकशी सुरू होती . तक्रारदार हा मौजा डोंगरगाव येथील मूळ रहिवाशी असल्याचे चौकशी अंती कळले.
सदरहु कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधिक्षक मधूकर गिते नागपूर चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेन्द्र गुरनुले व त्यांचे पथकातील कर्मचारी रोशन चांदेकर, संदेश वाघमारे,सतिश शिडाम , राकेश जांभुळकर,व अमोल शिडाम यांनी यशस्वीपणे केली.या घटनेने महसूल विभागासह अन्य शासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे.लाच घेणे व देणे हे कायद्याने गुन्हा आहे .याची पूरेपूर खात्री व जाणीव असतांना देखिल या लाचखोरांना लाचेचा मोह टाळता आला नाही.एसीबीने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे जनतेंनी स्वागत केले आहे.