Home Breaking News Chandrapur dist@ news उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून मोरेश्वर उधोजवार सन्मानित.

Chandrapur dist@ news उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून मोरेश्वर उधोजवार सन्मानित.

110

Chandrapur dist@ news

■ उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून मोरेश्वर उधोजवार सन्मानित.

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपुर:माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात ५ मार्च रोजी वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पत्रकार क्षेत्रातील दीपस्तंभ असलेले खरे वृत्तांत न्यूज पोर्टल युट्युब चॅनल चे संपादक ‘मोरेश्वर उधोजवार’ यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक डॉ.अविनाश सकुंडे, अल्पसंख्यांक आयोग (भारत सरकार दिल्ली) तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, सौ.शिल्पताई बनपूरकर, संपादक इंडिया न्यूज २४ म.प्र.म.अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला समन्वयक (आंतरराष्ट्रीय मानव अधिकार), सौ.जयश्रीमाई सार्वडेंकर, तुळशीरामजी जांभूळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते शाल श्रीफळ व शिल्ड देवून सन्मानित करण्यात आले….
सावली येथील पत्रकार मोरेश्वर ना.उधोजवार गत १५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्यांनी विविध क्षेत्रावर विपुल लिखाण केले आहे. निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करून मोरेश्वर उधोजवार यांनी मराठी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा.

मोरेश्वर उधोजवार यांना नुकताच ६ जानेवारी २०२३ ला The गडविश्व न्यूज तसेच लोकवृत्त न्यूज तर्फे सामाजिक तथा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व प्रांत अध्यक्ष प्राध्यापक महेश पानसे तथा डिजिटल मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, माहिती अधिकार व पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना प्रदेश अध्यक्ष तुळशीरामजी जांभुळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

त्यांच्या शिरपेचात रोवलेला हा मानाचा तुरा पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य नव्या पिढीला एक दीपस्तंभ ठरले आहे. मोरेश्वर उधोजवार यांनी २००९ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांना पत्रकारीता क्षेत्रामध्ये रस होता गेली १४ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून पत्रकारितेचे मूल्य जपत व जोपासत त्यांनी निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता केलेली आहे. पत्रकारितेतील अनेक बारकाव्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे.

चंद्रपूरचे स्थानिक दैनिक महाविदर्भ मध्ये काम करण्याची संधी त्यांना प्रथम मिळाली त्यावेळी त्यांनी पत्रकारितेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. वृत्तपत्राच्या बातम्या वाचून त्यांनी पत्रकारितेचे धडे घेतले त्यामुळे अनेक वृत्तपत्रे त्यांचे गुरु झाले. सकाळ, युवा राष्ट्र दर्शन, नागपूर मेट्रो, इत्यादी वृत्तपत्रात त्यांनी प्रामाणिकपणे काम केले व मराठी पत्रकारितेत एक वेगळा ठसा उमटविला. आपल्या पत्रकारितेला एक नवी देत महाराष्ट्र मत न्यूज 24 तास न्यूज पोर्टल तथा यूट्यूब चॅनल च्या यशस्वी वाटचालीनंतर खरे वृत्तांत न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक आहेत.

मुळात ते विश्वासू पत्रकार असल्याने त्यांच्या बातमीत विश्वासनियता आहे हेच त्यांच्या लिखाणाचं बलस्थान आहे सत्य शोधण्यासाठी सत्य दाखविण्यासाठी अविरतपणे ते कार्यरत असतात त्यांना मिळालेला हा पुरस्कार डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार हा डिजिटल मीडिया पत्रकारिता क्षेत्रातील महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार आहे त्यांना या
पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदर कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार, माहिती अधिकार व पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना पदाधिकारी तथा पाहुणे उपस्थित होते.