Home Breaking News Ballarpur city@ news बल्लारपुर न.प चौकात गॅस सिलेंडर दरवाढी च्या विरोधात...

Ballarpur city@ news बल्लारपुर न.प चौकात गॅस सिलेंडर दरवाढी च्या विरोधात युवक कांग्रेस व एनएसयूआय चे आंदोलन

143

Ballarpur city@ news

■ बल्लारपुर न.प चौकात गॅस सिलेंडर दरवाढी च्या विरोधात युवक कांग्रेस व एनएसयूआय चे आंदोलन

सुवर्ण भारत:ताहीर शेख
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर: केंद्र सरकारने घरगुती गॅसची किंमत ५० रुपये आणि व्यावसायिक गॅस ची किंमत ३५० रुपये वाढवल्याने
आता १४ किलो घरगुती गॅसची किंमत ११०३ रुपये झाली आहे तर १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत २११९ रुपये इतकी झाली आहे. म्हणून पूर्व खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ बल्लारपुर नगरपरिषद चौकत युवक कांग्रेस व एनएसयूआय ने धरणा प्रदर्शन केले.

माजी जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया व युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात धरना प्रदर्शन व आंदोलन घेण्यात आले. नरेंद्र मोदी मुर्दाबाद,नरेंद्र मोदी हाय हाय, निषेध असो निषेध असो केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.

त्रिपुरा, नागालँड, मेघालय या ईशान्येकडील राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या बरोबर मोदी सरकारने गॅस दरवाढ केली.गॅस दरवाढ करून गरीब व्यावसायिकांना आणखी कमर तोड़ली आहे.हे सरकार उद्योगपतींचे आहे. गोरगरीब जनतेचे नाही, मोदी सरकारला सामान्य जनतेचा थोडा जरी विचार असेल तर ही दरवाढ मागे घ्यावी. यासाठी तहसीलदार मार्फत मा.प्रधानमंत्री, पेट्रोलियम मंत्री यांना निवेदन पटविन्यात आले.

यावेळी काँग्रेसचे नेते नाना बुंदेल,माजी नगर सेवक भास्कर माकोड़े,जिल्हा महासचिव शंकर महाकाली,जुनैद सिद्दिकी यू.का अध्यक्ष,एन.एस.यू.आय अध्यक्ष दानिश शेख, वर्मा,अरविंद वर्मा,श्रीकांत गुजरकर, संदीप नाक्षीने,बशीर सिद्दीकी, तपन उगले, संजु सद्दाला, दीपक भास्कर,राजेश केशकर, रोशन ढेंगळे,राज वर्मा, प्रकाश गोलकर,भीम वर्मा, राहुल वर्मा,रवि वर्मा,रोहित सक्सेना,अमोल पिपळकर,शकील अहमद, सूरज वर्मा, लखन वर्मा,अमन केशकर,सूरज गेडाम भगवान संकत्तसाहब युवक कांग्रेस नेते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.