Chandrapur dist@ news
■ जूणी पेंशन लागू करा या प्रमुख मागणीसाठी…!
■ चंद्रपुर जिल्ह्यातील ८हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी होणार..!
■ १४ मार्चला तब्बल १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी जाणार बेमुदत संपावर..!
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
चंद्रपर:जूणी पेंशन लागू करा या प्रमुख व रास्त मागणी साठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेने येत्या १४ मार्चला बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून या संपात राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सहभागी होत असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर व कार्याध्यक्ष राजू धांडे यांनी प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली.
होवू घातलेल्या या बेमुदत संपात चंद्रपूर जिल्ह्यातील आठ हजार राज्य शासकीय कर्मचारी सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. सदरहु संपात शिक्षक , शिक्षकेतर , जिल्हा परिषद कर्मचारी व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होत असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या पदाधिका-यांनी आज चंद्रपूर मुक्कामी सांगितले .जुणी पेंशन (मागणी )बाबतचा प्रश्न शासन दरबारी ब-याच वर्षांपासून खितपत पडलेला आहे.हे विशेष! दरम्यान हा संप 100 टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी बांधवांनी या संपात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना केले आहे .