Home Breaking News बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाचे प्रयत्न करणार:सावे (मंत्री इतर मागास व बहुजन...

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाचे प्रयत्न करणार:सावे (मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण)

183

• बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाचे प्रयत्न करणार:सावे (मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण)

सुवर्ण महाराष्ट्र:किरण घाटे(सहसंपादक)

( मुंबई ) राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत असताना बिहार राज्यात ज्या प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचा आला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे अशी घोषणा राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या येथे केले.त्याचबरोबर बाहेर देशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 वरुन 100 होणार असे सुध्दा बोलले आणि बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांना सुध्दा वस्ती गृहात प्रवेश मिळणार वस्ती गृहात प्रवेशित नसनार्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात येईल असे सुध्दा बोलले. राज्यसरकारकडे ऐकून 31 मागगाण्यांचे निवेदन मंत्री मोहदयानं सादर करण्यात आले असून त्याबाबत एकमुखी ठराव पारित करण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रायपूर च्या अधिवेशनात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे सोबतच इतर ठराव करण्याचे श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जाते असे बोलले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश भागरत , माजी राज्यमंत्री परिणय फुके,माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवर,आ.किशोर जोरगेवार,आमदार रुपेश म्हात्रे,माजी आमदार दिगंबर विषे, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर,समन्वयक अशोकजी जीवतोड, भालचंद्र ठाकरे,आमदार वझाद मिर्झा, शरद वानखेडे, मुकेश नंदन, प्रा शेषराव येलेकर,गुनेश्र्वर आरीकर , अविनाश लाड,सुभाष घाटे,सुरेंद्र कुमार महिला प्रदेश अध्यक्ष कल्पना मानकर, ऋषभ राऊत,किसन बोंद्रे,चेतन शिंदे,शाम लेडे,प्रकाश साबळे,उमेश पाटील,प्रकाश पवार,यावेळ राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विधानपरिषद चे आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, आमदार विधानपरिषद यांचा सत्कार करण्यात आला, सकाळी 11 वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आझाद मैदान येथे ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी निदर्शने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले, त्यावेळी राज्य भरातुन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी युवा महासंघ ,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ, महीला महासंघ, विद्यार्थ्यी महासंघ,वकिल महासंघ, किसान महासंघ उपस्थित होते, अधिवेशनाचे प्रास्ताविक एकनाथ तारमले, सूत्रसंचालन मनोहर मडके, आभार अमर राऊत यांनी केले .

(बॉक्स) राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशभारतील ओबीसी संघटनेचे मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 ला सकाळी 12 वाजता पासून जंतर -मंतर न्यू दिल्ली येथे जातनीहाय जनगणना, केंद्रात ओबीसी मंत्रालय,क्रीमिलेरची मर्यादा वाढविणे, व इतर ओबीसींच्या मागण्या घेऊन धरणे आंदोलन व रॅली काढण्यात येणार आहे.