Home Breaking News काव्यकुंज काजवा चंद्रपूर संकलन रंज्जू मोडक

काव्यकुंज काजवा चंद्रपूर संकलन रंज्जू मोडक

281

काव्यकुंज काजवा चंद्रपूर संकलन रंज्जू मोडक

कृष्ण धवलं मेघ दाटले उंच उंच गगनात
बासुरी रंगात खेळते राधेच्या प्रेमात
विहरतो मोगरा चौफेर सुगंध परी मळ नाचतो उभ्या ग्रीष्मात

साद मैनेची आम्रवृ क्षात बहरते
गोकुळ वृंदावणी नाचतो पारिजातकाच्या मंद तालात
उदासलेल्या तप्त उन्हात पळस फुलतो आनंदाने रुपेरी सौदर्यात

नवा प्रवाह नव्या दिशा उजेडाच्या
पिंपळ पानाची हिरवी डहाळी
उगवतीचा सूर्य संदिग्ध कडेकपारी अंगावरी शेला सुकलेल्या मातीचा

बरसतात मोती शिंपले बनूणी
ठाव काळजाचा चुकतो अधांतरी
डोंगर दऱ्या आड झुकलेले नक्षत्र जसे खेळतात लपंडाव न सापडलेल्या काजव्यांचे

प्रा. डॉ. वैशाली भांडारकर, सहज सुचलं काव्य कुंज सदस्य महिला महाविद्यालय, उमरेड जि.नागपूर
8380893706