Chandrapur @dist news
•सुट्टीचा आनंद न उपभोगता चंद्रपूरचा संप मंडप कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने फुलला..!
•जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरात सुरु आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..!
•उद्या संप मंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन..!
सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)
चंद्रपुर:एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्या साठी गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरात लाखों कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.आज या संपाचा सहावा दिवस आहे.दरम्यान सुरु असलेल्या या संपाला चंद्रपूरसह जिल्ह्यातील बल्हारपूर ,मूल ,राजूरा , भद्रावती,वरोरा,चिमूर व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात बेमुदत संपाला उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद मिळत आहे.आज रविवार तसा सुट्टीचा दिवस पण या सुट्टीचा आनंद न उपभोगता कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागणीसाठी संप मंडपात उपस्थित राहण्यास प्रथम प्राधान्य देत आज ते मोठ्या संख्येने (संप मंडपात) हजर राहिले.महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही लक्षणिय अशीच होती.दरम्यान संप मंडपातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे काही जेष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.काही महिला कर्मचाऱ्यांची पेंशनवर आधारित मधूर गिते गाऊन संपकर्त्यांची मने जिंकली तर काही ठिकाणी संप मंडपात पथनाट्य सादर करुन रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले.सध्या तरी शासनाने या संपाबाबत तोडगा न काढल्यामुळे राज्य कर्मचा-यांचा संप असाच सुरु आहे.या संपामुळे सारी शासकीय यंत्रणा ठप्प पडली आहे.संपावर जाणा-या काही कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावले असल्याचे वृत्त आहे.सदरहु संपामुळे शेतकरी वर्ग, विद्यार्थ्यांना व सर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे .ही वस्तुस्थिती आहे.मार्च महिन्यात अनेक कामे पूर्ण करावी लागतात.याच महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना संप झाला.संपामुळे ती शासकीय कामे बंद पडली आहे. जुन्या पेंशनच्या मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे एकंदरीत दिसून येते.आज रविवारी चंद्रपूरातील संप मंडपात शासनाविरुध्दच्या घोषणाबाजीने सारे वातावरण दुमदुमून गेले होते. संपात महसूल,आरोग्य,जिल्हा परिषद व इत्तर विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जिल्ह्यात हा संप १००टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.सामाजिक बांधिलकी जपत सोमवारी चंद्रपूर संप मंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या शिबिरात काही राज्य शासकीय कर्मचारी रक्तदान करणार आहेत.
