Home Breaking News chandrapur @dist news •राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धाचे चंद्रपूरात आयोजन..!

chandrapur @dist news •राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धाचे चंद्रपूरात आयोजन..!

419

chandrapur @dist news

•राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धाचे चंद्रपूरात आयोजन..!

सुवर्ण भारत:किरण घाटे (सह संपादक)

चंद्रपूर:स्थानिक शांताराम पोटदुखी विधी महाविद्यालय येथे दि.२४ व २५ मार्चला ‘राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली आहे. “सत्यान्वेषी ” म्हणजेच सत्याचा शोध या कल्पनेअंतर्गत ही स्पर्धा संपन्न होत असल्याचे प्राचार्य डॉ. एजाज शेख व समन्वयक डॉ. पंकज काकडे यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे. चंद्रपुरातील ज्येष्ठविधीज्ञ सातपुते यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय बहिणाबाई महादेवराव सातपुते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा प्रायोजित केली असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतींना ही स्पर्धा समर्पित करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. एजाज शेख यांनी सांगितले. स्पर्धेला विविध राज्यातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ तसेच विधी महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकाला 15000 रुपये रोख, द्वितीय विजेत्याला 10000 रुपये रोख तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट अभिवक्ता स्पर्धकाला स्वर्गीय एड. किशोर देशपांडे स्मृति प्रित्यर्थ पाच हजार रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत . स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष सुधाताई पोटदुखे , सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित व अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.