Home Breaking News chandrapur@ city news • महाराष्ट्रातील शासकीय पदे कंत्राट पद्धतीने भरतीचा शासन...

chandrapur@ city news • महाराष्ट्रातील शासकीय पदे कंत्राट पद्धतीने भरतीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा:संभाजी ब्रिगेड.

65

chandrapur@ city news

• महाराष्ट्रातील शासकीय पदे कंत्राट पद्धतीने भरतीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा:संभाजी ब्रिगेड.

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपुर:महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून भारतात प्रसिद्ध आहे परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे अनेक निर्णय घेत आहात. त्यातीलच एक निर्णय म्हणजे आपण दिनांक १४ मार्च २०२३ तारखेला काढलेला सेवा पुरवठादार संस्थांची निवड करणारा शासन निर्णय क्रमांक काआआ-२०१३/प्र. क्र. २३३/कामगार -८ हा होय
आपणास जाणीव आहेच गेली अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे आपण अशा पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच करत आहात.

अस्मानी आणि शासकीय संकटाला सामोरे जाणारा शेतकरी बाप आधीच अडचणीत असताना दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी देखील आपण वरील निर्णयाच्यामुळे काढून घेत आहात. आपण काढलेला जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्या संपवण्याची नांदीच आहे असे आम्हास वाटते. या आपल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. कदाचित ही नाराजी रस्त्यावर आल्यास महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन आपण दिनांक १४ मार्च २०२३ रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या भरतीचा पदभरतीचा निर्णय शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी आपण व आपले शासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना संभाजी ब्रिगेडचे वतीने देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते व काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निर्देशने करून घोषणा देत निषेध नोंदविला.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, जिल्हाध्यक्ष प्रा डॉ दिलीप चौधरी, महानगर अध्यक्ष विनोद थेरे, महादेव धुमने, अशोक ठाकरे, पायल आईंडलवार, लता होरे, अर्चना चौधरी, मीनाक्षी धुमने, अशोक मुसळे, संजय बोटरे, किशोर ठेरे, दीपक खारकर, स्वराज कानतोडे, सोनू तोडासे, कशिष कोडपे, जयंत कोंडगुरले, धनश्री खडसे, शुभम बांगरे विशाखा मेश्राम हर्षद वैरागडे शिवम कंडे आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.