Home Breaking News निधन वार्ता • अधिवक्ता रमेशभाऊ पिंपळशेंडे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन!

निधन वार्ता • अधिवक्ता रमेशभाऊ पिंपळशेंडे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन!

1002

निधन वार्ता

• अधिवक्ता रमेशभाऊ पिंपळशेंडे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपूर:राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरचे सरचिटणीस माजी विक्रीकर अधिकारी ऍड.रमेश पिंपळशेंडे यांचे आज सोमवारी रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले .त्यांचा अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी सकाळी 9 वाजता मुंबई येथे करण्यात येणार आहे. संघटनेच्या धडाडीच्या एका पदाधिकऱ्याला संपूर्ण कर्मचारी वर्ग मुकला आहे . मृत्यू समयी त्यांचे वय 64 वर्षाचे होते.त्यांचे मागे पत्नी,दोन मुले ,सुना व नातवंडे व मोठाआप्त परिवार आहे.त्यांचे दुःखद निधनाची बातमी आज कानावर येताच अनेकांनी आपला दुखवटा व्यक्त केला .चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती संघटनेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे.