Home Breaking News कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण...

कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचे कडे.. !

390

कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचे कडे.. !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पांडुरंग पचारे हे दि.31-3-2023 ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांना कोरपनाचे तहसिलदार महेन्द्र वाकलेकर यांनी दि. 31मार्चला मध्यान्हानंतर शासन सेवेतून भारमुक्त केले.

त्या मंडळाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचेकडे सोपविण्यात आला आहे.चव्हाण हे गेल्या चार वर्षांपासून गडचांदूर महसूल मंडळाचा कार्यभार सांभाळत आहे.तर सेवानिवृत्त मंडळ अधिकारी पचारे यांनी 36 वर्ष 11 महिणे 3 दिवस महसूल विभागात पटवारी ते मंडळ अधिकारी म्हणून काम केले होते.आपल्या सेवेच्या कार्यकाळात त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यां सोबत जनतेचा देखिल विश्वास संपादन केला होता.सेवेच्या कालावधीतच त्यांनी कला क्षेत्रात देखिल आपली छाप सोडली होती.ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कोल्हापूरचे सभासद आहे.