Home Breaking News Ballarpur @city news • पिण्याचे पाण्याची नळ बिलाचे लूट मा.जी.प्रा बंद...

Ballarpur @city news • पिण्याचे पाण्याची नळ बिलाचे लूट मा.जी.प्रा बंद करा:डॉ. अभिलाषा गांवतुरे-बहरे • भूमिपुत्र ब्रिगेडच्या संघटने तर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले

263

Ballarpur @city news

• पिण्याचे पाण्याची नळ बिलाचे लूट मा.जी.प्रा बंद करा:डॉ. अभिलाषा गांवतुरे-बहरे

• भूमिपुत्र ब्रिगेडच्या संघटने तर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले

सुवर्ण भारत: पारिश मेश्राम

उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री डॉ.अभिलाषा गांवतुरे-बहेरे यांच्या नेतृत्वाखाली व कार्यकारी अभियंता चंद्रपूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व व तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले. बल्लारपूर जीवन प्राधिकरण महाराष्ट्र विभागा मार्फत लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जाते.त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणावर मासिक बिल आकारले जाते.आणि एखाद्या व्यक्तीने महिन्याला ३० युनिट पाणी खर्च केले तर त्याचे बिल ८०० रुपये येते, जे खूप जास्त आहे आणि सरकार थेट गरीब कुटुंबाला लुटण्याचे काम करत आहे, यामुळे जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर बिल भरले नाही.तर जीवन प्राधिकरण बिलावर व्याज लावते, बल्लारपूर शहर डोंगरावर असल्याने पाण्याचे मीटर वाऱ्यापेक्षा वेगाने फिरते आणि त्यामुळे लोकांना नळाचे अधिक बिल येत आहे.पाणी पुरवठा विभाग बल्लारपूर शहरातील जे लोक बिले भरू शकले नाहीत त्यांचे कनेक्शन तोडत आहे, जे घटनाबाह्य आहे. केवळ गरीब निराधारांवर कारवाई केली जात आहे.आणि ज्यांचे मीटर खराब आहेत त्यांना दरमहा ५४० रुपये पाणी बिल पाठवले जाते, जे चुकीचे आहे.

या कुटुंबाला नवीन मीटर बसवावे.नागरिक पालिका व प्रशासनाला सर्व प्रकारचे कर भरतात,त्यामुळे जनतेला शुद्ध व मोफत पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
मागण्या मजीप केली आहे.
प्रत्येक कुटुंबाला १)१५ युनिट पाणी मोफत द्यावे आणि १५ युनिटच्या वर फक्त रु.
२) नळाच्या बिलावर आकारले जाणारे व्याज बंद करावे
3) नवीन कनेक्शन धारका कडून घेतलेली १५०० रुपयांची सुरक्षा ठेव कमी करून ५०० रुपये करण्यात यावी आणि ग्राहकाला व्याज देण्यात यावे.
४) ज्यांच्याकडे जुनी बिले आहेत, त्यांचे व्याज ५० टक्के कमी करून व्याज शून्य करावे.
५) बल्लारपूर शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक असतानाही नळ विभागाचे एकच केंद्र आहे, लोकांना सहज बिल भरता यावे यासाठी चार ठिकाणी वेगवेगळी केंद्रे करावीत.
६) कोणाला नळाबाबत काही अडचण असल्यास त्याच्यासाठी कस्टमर केअर नंबर तयार करून समस्या लवकरात लवकर सोडवावी व त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये.
७) आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी अमन पसंद बहुउद्देशीय संस्थेचे सचिव ताहेर हुसेन, सहसचिव सय्यद अजीज, शीतल ताई हस्ते, विश्वास निमसतकर, अनीस खान, बशीर खान, दीपक बनोत, समीर, जावेद शेख, यासीर खान, मोहसीन शेख, श्रीकांत, राहुल, कार्यकर्ते उपस्थित होते.