Home Breaking News chandrapur@ city news • भगवान महावीर जयंती निमित्त चंद्रपूर शहरात शोभायात्रा. ...

chandrapur@ city news • भगवान महावीर जयंती निमित्त चंद्रपूर शहरात शोभायात्रा. • यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभा यात्रेचे स्वागत

61

chandrapur@ city news
• भगवान महावीर जयंती निमित्त चंद्रपूर शहरात शोभायात्रा.

• यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभा यात्रेचे स्वागत

सुवर्ण भारत: किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपुर:चंद्रपूर शहरात आज भगवान महावीर जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे जटपुरा गेट येथे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगांवकर, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, विमल कातकर, वंदना हजारे, कविता निखारे, मुन्ना जोगी, विश्वजीत शाहा, बादल हजारे, प्रभाकर खारीकर, विजय मद्दीवार आदींची या वेळी उपस्थिती होती.

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या असा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त जैन समाज बांधवांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. दरम्यान चंद्रपूरातील मुख्य मार्गावरील जटपुरा गेट येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेच्या स्वागताची व्यवस्था करण्यात आली होती. सदरहु शोभायात्रा शहराच्या मुख्यमार्गाने होत जटपुरा गेट येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या शिवाय शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.