Home Breaking News chandrapur @city news • महाकाली यात्रेत येणा-या भाविकांची गैरसोय टाळावी: ॲड. सुनीता...

chandrapur @city news • महाकाली यात्रेत येणा-या भाविकांची गैरसोय टाळावी: ॲड. सुनीता पाटील ‌

405

chandrapur @city news
• महाकाली यात्रेत येणा-या भाविकांची गैरसोय टाळावी: ॲड. सुनीता पाटील

सुवर्ण भारत:किरण घाटे (सह संपादक)

चंद्रपूर:आराध्य दैवत माता महाकाली चंद्रपूर येथे अनेक वर्षापासून यात्रा भरत आलेली आहे. विविध ठिकाणा वरुन भाविक दर्शना करीता या ठिकाणी येतात. दरम्यान नांदेड़, परभणी, कंधार, पूर्णा, माहुर, अकलूज या गावातून या शिवाय मराठवाड़ातील विविध भागातील भक्तगण मोठ्या संख्येने माता महाकाली मंदिरात येत असतात .विदर्भातुन देखिल अनेक भाविक चंद्रपूरला येत आहे . उपरोक्त सर्व भक्त माता महाकालीच्या श्रध्येपोटी झरपट नदीत स्नान करतात . किती ही घाण असली तरी ही नदी भक्तांना मात्र सुतक सोडवण्यासाठी पवित्रच अशी वाटत असते. कारण त्यांना या शिवाय दुसरा पर्याय नाही. होय !माता महाकाली देवस्थान संस्थान मार्फ़त भक्तांची स्नान करण्याची व्यवस्था केली नाही .हे तेव्हढेच सत्य आहे. भक्तानां अपू-या ज्ञानामुळे व माहिती मुळे मल ,मूत्र वाहणाऱ्या नदी व नाल्यात( ते )अंघोळ करीत असल्याचे दृष्य आज ही बघावयास मिळत आहे.
रैयतवारी , महाकाली कॉलरी कड़े असलेल्या स्मशानभूमि जवळील नाल्यात भक्तांची झुबंळ दिसत आहे , भक्तानां माहिती नाही व माहिती जरी असली तरी शेवटी त्यांचे जवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही अश्या घाण पसरलेल्या पाण्यात ते स्नान करीत आहे .योग्य ती सोय माता महाकाली देवस्थान संस्थान मार्फत करुन देण्यात यावी तदवतचं जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासनाने या कडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी चंद्रपूर आम आदमी पार्टी व दर्शनासाठी येणा-या भक्तगणां कडून करण्यात येत आहे. चंद्रपुर मधील स्थानिक भक्तांची तक्रार आल्यावर आप महानगरच्या महिला अध्यक्ष ॲड. सुनीता पाटिल यांनी महाकाली कॉलरी, रैयतवारी कड़े असलेली स्मशान भूमि कडील नाल्यात आंघोळ करीत असलेल्या भक्तांच्या भावना जाणून घेत उद्या जिल्हा प्रशासन व महानगर पालिका यांना निवदेन देवून योग्य ती सोय करावी व स्वच्छते कड़े अधिक भर द्यावा अश्या आशयाची मागणी करणार आहे.
सदरहु स्थळाला भेट देताना राणी जैन, जास्मिन शेख, रूपा काटकर, शबनम शेख, मीना पोटफोडे, सिकंदर सागोरे, राजेश चेडगुलवार आदीं पदाधिकारी उपस्थित होते.