Home Breaking News chandrapur @city news • कोरपणाचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पंचारेंचा सपत्निक सत्कार...

chandrapur @city news • कोरपणाचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पंचारेंचा सपत्निक सत्कार ! • बावणे परिवाराकडून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन !

194

chandrapur @city news
• कोरपणाचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पंचारेंचा सपत्निक सत्कार !

• बावणे परिवाराकडून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा कोरपणा नगरपंचायतीचे स्विकृत नगर सेवक विजयराव बावणे यांनी नुकताच कोरपणा येथील “बावणे” निवासस्थानी कोरपना महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे व त्यांचे सुविद्य पत्नी ज्योतीताई पचारे यांचा शाल, श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या वेळी बावणे कुटुंबातील सर्व सदस्यगण प्रामुख्याने उपस्थित होते. गेली अनेक वर्ष पचारे यांनी महसूल विभागात पटवारी ते मंडळ अधिकारी अशी जबाबदारी सांभाळत सर्व सामान्य जनतेची कामे त्यांनी वेळीच करुन त्यांना योग्य न्याय दिला.महसूल विभागातील त्यांचा कामाचा अनुभव दांडगा असल्याचे विजयराव बावणे या वेळी बोलताना म्हणाले.आयोजित या कार्यक्रमाला उत्तमराव पेचे,भाऊजी चव्हान ,गणेश गोडे,उत्तम गेडाम व गावातील अन्य प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती.