Home Breaking News Gughus@ city news • छत्रपती शिवाजी महाराजांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित.

Gughus@ city news • छत्रपती शिवाजी महाराजांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित.

346

Gughus@ city news
• छत्रपती शिवाजी महाराजांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित.

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : रयतेचे राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे ज्यांनी स्वप्न पाहिले असे शक्तिशाली पराक्रमी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना हिरावून नेणारा काळा दिवस म्हणजेच 03 एप्रिल 1680 याच दिवशी राजेंनी वयाच्या 50 व्या वर्षी रायगडावर प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला.

मात्र छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आदर्श कर्माने व विचाररूपाने सदैव जिवंत राहतील

आज शहर काँग्रेस कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व सामाजिक कार्यकर्ते गजानन नागोसे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पित करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, अलीम शेख,देव भंडारी,रफिक शेख,सन्नी कुम्मरवार,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे,कपिल गोगला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.