Home Breaking News chandrapur city@ news • चंद्रपूरात भव्य रक्तदान शिबीर संपन्न! • प्रशांत...

chandrapur city@ news • चंद्रपूरात भव्य रक्तदान शिबीर संपन्न! • प्रशांत हिवरे व अझीम खान यांचा पुढाकार!

385

chandrapur city@ news
• चंद्रपूरात भव्य रक्तदान शिबीर संपन्न!

• प्रशांत हिवरे व अझीम खान यांचा पुढाकार!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नायरा एनजी व एच.के पेट्रोलियमचे मालक प्रशांत हिवरे आणि अझीम खान यांचे पुढाकारातून दि.७एफ्रिलला चंद्रपूरात भव्य रक्तदान शिबीर व विनामुल्य कॅन्सर तपासणी या शिवाय आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील अंकुर ब्लड बॅंकेचे संचालक डॉ.विलास मुळे यांचे मार्गदर्शनाखाली अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तिने रक्तदान केले.सदरहु कार्यक्रमाला टाटा मेमोरीयल हाॅस्पिटलचे तज्ञ डॉ.गोपीचंद वरटकर यांनी या वेळेस रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली.अनेक रुग्णांनी या आयोजित शिबीराचा लाभ घेतला असल्याचे प्रशांत हिवरे व अझीम खान यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या पार पडलेल्या कार्यक्रमाला नायरा एनजी लि.चे डीव्हीजनल मॅनेजर राहुल वाधवा व अभिषेक पुराणिक यांचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.उपरोक्त शिबीर यशस्वी करण्यासाठी अनुप ठेंबरे ,धीरज आत्राम,यश बांदुरकर,व अन्य कर्मचारी बांधवांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन स्मिताताई (प्रेरणा)हिवरे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार देवेंद्र हिवरे यांनी मानले .