चिवड्यात आढळली पाल विषबाधेमुळे ६ जण रुग्णालयात दाखल वरोऱ्यात खळबळ

वरोरा : वरोरा येथील बस स्टॉप रोडवरील आयटीआय (ITI) लगत असलेल्या ‘मनोज चिवडा सेंटर’ ग्राहकाने खरेदी केलेल्या चिवड्यात पाल आढळल्याने खाण्यात आलेल्या पदार्थातून सहा जणांना गंभीर विषबाधा झाली.
सर्व बाधित रुग्णांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर अन्नातून विषबाधा झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विषबाधा झालेल्या सर्व सहाही रुग्णांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची नावे.
सुवर्णा प्रवीण कोहळे (वय ४५ वर्ष, रा. माजरी)
प्रविन शालीकराम कोहळे (वय ५० वर्ष, रा. माजरी)
पंकज दिगंबर आवारी (वय ४० वर्ष, रा. राळेगाव)
दिगाबर विठ्ठजी आवारी (रा. राळेगाव )
अफजल रफीक अहेमतखान (रा. भद्रावती / कोगाव)
शेख रेहमान (रा. कोरेगाव)
आयुब सागीर खान ( भद्रावती )
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या चिवडा दुकान मालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ग्राहकांशी ताठर भूमिका
सदर चिवडा दुकानदाराने सुरवातीचे काळात ग्राहकांना जागेवरच सुविधा दिली.त्यानंतर मात्र चिवडा विक्री दामदुप्पट व्हायला लागली तर हल्ली ग्राहकांना चिवडा घेण्यासाठी दुकान मालकापर्यंत कष्ट घ्यावे लागते.तसेच पहिले मोफत पाण्याची व्यवस्था होती.परंतु एका झटक्यात श्रीमंत होण्याचे लोभापाई ग्राहकांना आता बिस्लरीचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.सदर दुकानदार ग्राहकांशी ताठर भूमिकेने वागतात त्यामुळे ग्राहकांच्या भावनेशी व जीवाशी खेळणाऱ्या दुकानदारावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी जोर धरत आहे.
चिवडा दुकान वाहतुकीला
अडसर
चिवडा दुकान हे अतिक्रमित जागेवर असून दुकानलगत बस स्टँड असून ग्राहकांची गर्दी असते वाहतुकीचे रस्त्यावर ग्राहकांची वाहने लागली असते त्यामुळे परिवहन महामंडळाची बसेस तसेच इतर मोठी वाहनांची वाहतूक करण्यास सदर चिवडा दुकान अडसर ठरले आहे.प्रशासनाने सदर चिवडा दुकान हटवण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा होत आहे.







