Home Breaking News Ghugus city@ news • भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे आमच्यासाठी देवदूत...

Ghugus city@ news • भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे आमच्यासाठी देवदूत पारखी कुटुंबीयांचे मनोगत. • रात्री अडीच वाजता बी-निगेटिव्ह रक्तगटाची पिशवी दिली उपलब्ध करून .

159

Ghugus city@ news

• भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे आमच्यासाठी देवदूत पारखी कुटुंबीयांचे मनोगत.

• रात्री अडीच वाजता बी-निगेटिव्ह रक्तगटाची पिशवी दिली उपलब्ध करून .

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील इंदिरानगर येथे राहणाऱ्या अमरदीप पारखी यांची पत्नी प्रणाली पारखी यांना रात्री प्रसूतीकरीता वणी येथे भर्ती करण्यात आले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास प्रसूतीदरम्यान प्रणाली पारखी यांना बी-निगेटिव्ह या रक्तगटाची अत्यंत आवश्यकता पडली. त्यामुळे अमरदीप पारखी यांनी आपल्या मित्रांकडे यासाठी प्रयत्न केला परंतु तो रक्तगट मिळाला नाही.

नंतर त्यांनी घुग्घुस येथील अमोल खिरटकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मध्यरात्री भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून याबाबत माहिती दिली त्यांनी गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बी-निगेटिव्ह हा रक्तगट पारखी कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला. प्रणाली पारखी यांची प्रसूती झाली असून त्यांनी बाळाला जन्म दिला आहे.

त्याअनुषंगाने अमरदीप पारखी व अमोल खिरटकर यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले,व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे आमच्यासाठी देवदूत आहेत असे मनोगत व्यक्त केले.