Home Breaking News Ballarpur city@ news बुद्ध पौर्णिमा समारोह समिती बल्लारपूर तर्फे कर्मवीर संत...

Ballarpur city@ news बुद्ध पौर्णिमा समारोह समिती बल्लारपूर तर्फे कर्मवीर संत गाडगेबाबा महानाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन

333

Ballarpur city@ news

• बुद्ध पौर्णिमा समारोह समिती बल्लारपूर तर्फे कर्मवीर संत गाडगेबाबा महानाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण भारत:परिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

 

बल्लारपूर- बल्लारपूर शहरातील बीपीएम कलामंदिर खुले मैदान पेपर मिल ओल्ड काॅलनी येथे दिनांक ५ मे २०२३ बुद्ध पौर्णिमा निमित्ताने सायंकाळी ६.०० वाजता बल्लारपूर पेपर मिल ओल्ड कॉलनी परिसरात भव्य दिव्य कर्मवीर संत गाडगेबाबा महानाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी कार्यक्रमा मध्ये कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर ५० कलाकार विविध कलेच्या माध्यमातून नाट्य सादर करणार आहेत. या कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या महानाट्याचे निर्देशन शितल दोडके यांनी केले आहे. या महानाट्याचे लेखक विठ्ठल घोडे व या महानाट्याचे निर्मिती प्रमुख विजय गायगवली आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आकोला येथील सुप्रसिद्ध शिल्पकार धम्म इतिहास अभ्यासक महेंद्र शेवगावकर यांच्या प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून सरूवात केली जाणार आहे. या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी पाटील, बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील व तसेच बल्लारपूर पेपर मिल चे मॅनेजर उदय कुकडे हे उपस्थित राहणार आहे तरी आपण बल्लारपूर शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान बल्लारपूर शहरातील बुद्ध पौर्णिमा समारोह समिती यांनी केले आहे.